Ajit Pawar On Vasant More | पुण्यातील स्वारगेट बस स्थानकातील शिवशाही बसमध्ये एका 26 वर्षीय तरुणीवर बलात्कार करण्यात आल्यानंतर राज्यभरातून संताप व्यक्त केला गेला. या प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडेला तीन दिवसांनंतर अटक करण्यात आली. मात्र तरुणीवर झालेल्या अत्याचारानंतर ठाकरे गटाचे नेते वसंत मोरे यांनी शिवसैनिकांसोबत बुधवारी स्वारगेट बस स्थानकात घुसून सुरक्षा रक्षकांची केबिनची तोडफोड केली होती. ज्यानंतर उद्धव ठाकरेंनी फोनवर संवाद साधत वसंत मोरेंचे कौतुक केले होते. मात्र याच घटनेवरुन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वसंत मोरेंवर निशाणा साधला आहे. काय म्हणाले अजित पवार? “स्वारगेट एसटी आगारात घडलेली घटना हि निश्चितच दुर्दैवी आहे. अशा घटनांना आळा घालण्याचे सर्वतोपरी प्रयत्न सरकार करत आहे. स्वारगेट अत्याचार प्रकरणाचा पूर्ण तपास होऊन सत्यता पुढे येऊ द्या. एखादा आरोपी सापडत नाही म्हणून तोडफोड करत असाल तर, स्वतःला वेगळं दाखवण्याचा प्रयत्न कराल. सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान कोणी करत असेल तर तो पक्ष किंवा त्या कार्यकर्त्याकडून वसूल केला पाहिजे, असं कोर्टाने सांगितलं आहे. स्वतःला वेगळं दाखवण्याच्या प्रयत्नात कोणी सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करत असेल तर ते खपवून घेतले जाणार नाही,” असा इशारा अजित पवारांनी दिला आहे. Ajit Pawar On Vasant More | “काही प्रकरणात राग व्यक्त करण्याच्या काही गोष्टी असू शकतात. काही अतिउत्साही कार्यकर्त्यांचा उत्साह पाहायला मिळतोय, त्यांच्यावरही कायद्याच्या चौकटीत राहून कारवाई केली जाईल,” असे अजित पवार यांनी नाव न घेता वसंत मोरे यांच्यावर टीका केली. त्यामुळे आता चर्चेला उधाण आले आहे. Ajit Pawar On Vasant More | वसंत मोरेंचं आंदोलन सुरक्षा रक्षकांच्या केबिनबाहेर, स्वारगेट बसस्थानक परिसरात अनेक कंडोम पडले होते. याचा अर्थ येथे दररोज बलात्कार होतात. या घटनेला जर कुणी कारणीभूत असेल तर ते सुरक्षारक्षक आहेत. मग इथे सुरक्षा रक्षकांची केबिन कशाला ठेवली? असं म्हणत वसंत मोरे यांनी आंदोलन केलं होतं. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी फोन करत वसंत मोरेंचं कौतुक केलं होतं. ज्याचा ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. हेही वाचा: ट्रम्प यांना भेटायला येताना सूट का घातला नाही? युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष उत्तर देत म्हणाले…