WI vs SA : वियान मुल्डरचे ऐतिहासिक त्रिशतक! ‘हा’ पराक्रम करणारा ठरला जगातील पहिलाच खेळाडू

WI vs SA Wiaan Mulder Triple century : एकीकडे भारतीय संघाचा कर्णधार बनताच शुबमन गिलने धुमाकूळ घातला आहे, तर दुसरीकडे दक्षिण आफ्रिकेचा नवा कर्णधार वियान मुल्डरनेही इतिहास रचला आहे. तो कायमस्वरूपी कर्णधार नसला तरी, झिम्बाब्वेविरुद्ध त्याने खेळलेली खेळी अनेक विक्रम मोडणारी ठरली आहे. जेव्हा संपूर्ण संघाने मिळून ५०० पेक्षा किंचित जास्त धावा केल्या, तेव्हा वियान मुल्डरने एकट्याने ३०० धावांचा पाऊस पाडला. विशेष म्हणजे त्याने ३३४ चेंडूंत ४९ चौकार आणि ४ षटकारांसह ३६७ धावांची नाबाद खेळी साकारली.
वियान मुल्डरने रचला इतिहास –
दक्षिण आफ्रिकेच्या कसोटी इतिहासात फक्त एकदाच असा प्रसंग घडला होता, जेव्हा एखाद्या फलंदाजाने त्रिशतक ठोकले होते. आता वियान मुल्डरच्या रूपाने दक्षिण आफ्रिकेला दुसरा त्रिशतकवीर फलंदाज मिळाला आहे.दक्षिण आफ्रिका आणि झिम्बाब्वे यांच्यात दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळली जात आहे. मालिकेतील पहिला सामना दक्षिण आफ्रिकेने जिंकला होता. दुसऱ्या सामन्यासाठी वियान मुल्डरला दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार बनवण्यात आले.
कसोटीत त्रिशतक ठोकणारा पहिला कर्णधार बनला वियान मुल्डर –
#WiaanMulder puts the team first — declares at lunch on 367*, choosing not to chase down Lara’s 400 despite being in unstoppable form.
He walks off with the highest individual score in an away Test — a record in itself. 👏#ZIMvSA #TestCricket #Proteas pic.twitter.com/uRCBitjw0q
— lightningspeed (@lightningspeedk) July 7, 2025
या दुसऱ्या कसोटीत वियानने अप्रतिम त्रिशतक ठोकले. कर्णधार म्हणून त्रिशतक ठोकणारे फलंदाज फार कमी आहेत. दक्षिण आफ्रिकेसाठी असे करणारा तो पहिला कर्णधार ठरला आहे. यापूर्वी २०१२ मध्ये द ओव्हल येथे हाशिम अमलाने त्रिशतक ठोकले होते, पण तो कर्णधार नव्हता. वियानने कर्णधार म्हणून त्रिशतक ठोकण्याचा पराक्रम केला आहे. आता मुल्डर दक्षिण आफ्रिकेसाठी कसोटीत सर्वात मोठी खेळी खेळणारा फलंदाज बनला आहे. हाशिम अमलाने ३११ धावा केल्या होत्या, पण आता मुल्डरने त्याला मागे टाकले आहे.
हेही वाचा – ICC New CEO : संजोग गुप्ता ICC चे नवे CEO म्हणून नियुक्त; क्रिकेटच्या जागतिक विस्ताराला मिळणार गती!
वियान मुल्डरने ठोकले कसोटीतील सर्वात वेगवान त्रिशतक –
वियान मुल्डरने दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात वेगवान त्रिशतक ठोकले आहे. यात भारताच्या वीरेंद्र सेहवागचा विक्रम थोडक्यात वाचला. सेहवागने २००८ मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध फक्त २७८ चेंडूंत त्रिशतक ठोकले होते. वियान मुल्डरने झिम्बाब्वेविरुद्ध २९७ चेंडूंवर त्रिशतक पूर्ण केले. या यादीत तिसऱ्या क्रमांकावर हॅरी ब्रूक आहे, ज्याने २०२४ मध्ये पाकिस्तानविरुद्ध ३१० चेंडूंत त्रिशतक ठोकले होते.
कर्णधार म्हणून पदार्पणातच त्रिशतक ठोकणारा पहिलाच खेळाडू –
वियान मुल्डर कर्णधार म्हणून पदार्पणातच त्रिशतक ठोकणारा जगातील पहिला खेळाडू ठरला आहे. मालिकेतील मागील सामन्यात दक्षिण आफ्रिकेचे कर्णधारपद केशव महाराजकडे होते, पण दुसऱ्या सामन्यापूर्वी तो जखमी झाला आणि त्यानंतर वियान मुल्डरला कर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आली. या संधीचा मुल्डरने योग्य फायदा घेतला आणि आजपर्यंत जगातील कोणत्याही कर्णधाराला जमले नाही, ते काम त्याने करून दाखवले.





