ICC New CEO : संजोग गुप्ता ICC चे नवे CEO म्हणून नियुक्त; क्रिकेटच्या जागतिक विस्ताराला मिळणार गती!

Sanjog Gupta Appointed ICC CEO : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) संजोग गुप्ता यांची मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) म्हणून नियुक्ती केली आहे. जय शाह यांच्या नेतृत्वाखालील समितीने संजोग गुप्ता यांना आयसीसीचे सातवे सीईओ म्हणून नियुक्त केले आहे. ते सोमवारपासून आपले पद स्वीकारतील. गुप्ता हे ऑस्ट्रेलियाच्या ज्योफ एलार्डिस यांची जागा घेतील, ज्यांनी यावर्षी चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी वैयक्तिक कारणांमुळे आपल्या पदाचा राजीनामा दिला होता.
२५ देशांतून आले होते २५०० अर्ज –
यापूर्वी डिस्ने स्टारमध्ये सीईओ (स्पोर्ट्स) म्हणून कार्यरत असलेले गुप्ता तात्काळ प्रभावाने आपली नवीन भूमिका स्वीकारतील. आयसीसीने सांगितले की, या पदासाठी २५ देशांतून २,५०० हून अधिक अर्ज प्राप्त झाले. यापैकी १२ उमेदवारांची अंतिम यादी तयार करण्यात आली. आयसीसीने स्पष्ट केले की, उमेदवारांमध्ये क्रीडा प्रशासकीय संस्थांशी संबंधित नेते तसेच विविध क्षेत्रांतील वरिष्ठ कॉर्पोरेट अधिकारी यांचा समावेश होता.
JioStar CEO Sanjog Gupta has been named as the ICC CEO. 🇮🇳 pic.twitter.com/fCG4gntafn
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) July 7, 2025
संजोग गुप्ता यांच्या नावाची शिफारस नामांकन समितीने केली, ज्यामध्ये आयसीसीचे उपाध्यक्ष इम्रान ख्वाजा, इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्ड (ईसीबी) चे अध्यक्ष रिचर्ड थॉम्पसन, श्रीलंका क्रिकेट (एसएलसी) चे अध्यक्ष शम्मी सिल्वा आणि भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) चे सचिव देवजीत सैकिया यांचा समावेश आहे. आयसीसीचे अध्यक्ष जय शाह यांनी गुप्ता यांच्या नियुक्तीला मान्यता दिली.
हेही वाचा – IND vs ENG : एक बिहारी इंग्लंडवर पडला भारी! आकाश दीपने १० विकेट्स घेत रचला नवा इतिहास
संजोग गुप्ता यांनी अनेक खेळांना दिले प्रोत्साहन –
आयसीसीने म्हटले आहे की, संजोग गुप्ता हे भारत आणि जागतिक स्तरावर क्रीडा प्रसारण क्षेत्रातील परिवर्तनामागील प्रेरक शक्ती आहेत. आयसीसीच्या निवेदनात प्रो कबड्डी लीग आणि इंडियन सुपर लीग (फुटबॉल) यासारख्या लीगच्या स्थापनेत आणि विस्तारात तसेच प्रीमियर लीग आणि विम्बल्डन यासारख्या जागतिक स्पर्धांना प्रोत्साहन देण्यात गुप्ता यांच्या योगदानाचा उल्लेख करण्यात आला आहे.
जय शाह काय म्हणाले?
जय शाह यांनी सांगितलं की, संजोग गुप्ता यांचा क्रीडा रणनीती आणि व्यावसायीकरणातील अनुभव आयसीसीसाठी महत्त्वपूर्ण ठरेल. त्यांनी नमूद केलं की, संजोग यांच्याकडे क्रीडा रणनीती आणि व्यावसायीकरणाचा विस्तृत अनुभव आहे, जो आयसीसीसाठी अमूल्य ठरेल. गुप्ता हे एलार्डिस यांची जागा घेतील, ज्यांनी चार वर्षांच्या कार्यकाळानंतर यावर्षी जानेवारीत पद सोडलं होतं.
पत्रकार म्हणून सुरू केली होती कारकीर्द –
संजोग गुप्ता यांनी पत्रकार म्हणून आपली कारकीर्द सुरू केली होती आणि २०१० मध्ये ते स्टार इंडिया (आता जियोस्टार) यांच्याशी जोडले गेले. २०२० मध्ये त्यांची डिज्नी आणि स्टार इंडियामध्ये क्रीडा प्रमुख म्हणून नियुक्ती झाली. नोव्हेंबर २०२४ मध्ये वायाकॉम १८ आणि डिज्नी स्टार यांच्या विलीनीकरणानंतर गुप्ता यांची जियोस्टार स्पोर्ट्सचे सीईओ म्हणून नियुक्ती झाली होती.





