WI vs SA : आफ्रिकेविरूध्दच्या टी-20 मालिकेसाठी वेस्ट इंडिजचा संघ जाहीर..! दोन स्टार खेळाडूंची माघार, समोर आलं ‘हे’ कारण…

WI vs SA T20I Series : वेस्ट इंडिज आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात तीन सामन्यांची टी-20 मालिका होणार आहे. या मालिकेसाठी वेस्ट इंडिज संघाने आपला संघ जाहीर केला आहे. दोन दिग्गज टी-20 खेळाडू या संघात नाहीत. हे खेळाडू दुसरे कोणी नसून आंद्रे रसेल आणि जेसन होल्डर आहेत.
या दोन्ही खेळाडूंनी क्रिकेट वेस्ट इंडिजकडे विश्रांतीची मागणी केली होती आणि बोर्डाने त्यांना दक्षिण आफ्रिकेविरुद्ध विश्रांती देण्याचा निर्णय घेतला आहे. ही मालिका 23 ते 27 ऑगस्ट दरम्यान खेळवली जाणार आहे. या मालिकेतील सर्व सामने त्रिनिदाद येथील ब्रायन लारा क्रिकेट अकादमी स्टेडियमवर खेळवले जातील.
दोन्ही खेळाडूंना का मिळाली विश्रांती ?
दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या टी-20 मालिकेसाठी संघाची घोषणा करताना वेस्ट इंडिजचे क्रिकेट संचालक म्हणाले की, “आंद्रे रसेल आणि जेसन होल्डरने दोघांनीही विश्रांती आणि रिकव्हरीसाठी वेळ मागितला आहे. कारण दोघांनीही इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सलग पाच कसोटी सामने खेळले आहेत. तसेच ते विश्रांतीच्या कालावधीत क्रिकेट वेस्ट इंडिजच्या विज्ञान आणि चिकित्सा संघासोबत काम करतील.”
मुख्य प्रशिक्षकाचे मोठे वक्तव्य…
वेस्ट इंडिजचे मुख्य प्रशिक्षक डॅरेन सॅमी म्हणाले की, “दक्षिण आफ्रिकेच्या मजबूत संघाचा सामना करणे ही आमच्या संघासाठी पुनर्रचना करण्याची आणि त्यांच्या खेळाच्या योजनेवर पुन्हा लक्ष केंद्रित करण्याची उत्तम संधी आहे. आम्ही नुकतेच त्यांच्याविरूध्द कसोटी मालिका खेळलो आहोत आणि त्याचे मिश्र परिणाम मिळाले आहेत, त्यामुळे ही एक रोमांचक आणि महत्त्वाची मालिका होणार आहे.आम्ही निवडलेल्या संघावर मला विश्वास आहे आणि 2026 मध्ये होणाऱ्या पुढील टी-20 विश्वचषकावर लक्ष ठेवून, मला माहित आहे की खेळाडू यश मिळविण्यासाठी खूप उत्सुक असतील.”
CWI announces T20 squad for the #T20Fest against South Africa in Trinidad!🇹🇹🔥
Read More⬇️ https://t.co/qKOerGXZNp#T20Fest #WIvSA pic.twitter.com/6vvXuxfkKz
— Windies Cricket (@windiescricket) August 18, 2024
वेस्ट इंडिज वि. दक्षिण आफ्रिका सामन्याचे वेळापत्रक…
पहिला टी-20 : 23 ऑगस्ट (ब्रायन लारा क्रिकेट अकादमी)
दुसरी टी-20 : 25 ऑगस्ट – (ब्रायन लारा क्रिकेट अकादमी)
तिसरी टी-20 : 27 ऑगस्ट (ब्रायन लारा क्रिकेट अकादमी)
Team India : मोहम्मद शमी ‘या’ स्पर्धेतून करणार पुनरागमन, तब्बल 11 महिन्यांनंतर उतरणार मैदानात….
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी वेस्ट इंडिजचा संघ : रोव्हमन पॉवेल (कर्णधार), रोस्टन चेस (उप-कर्णधार), ॲलेक अथनाझे, जॉन्सन चार्ल्स, मॅथ्यू फोर्ड, शिमरॉन हेटमायर, फॅबियन ऍलन, शाई होप, अकेल होसेन, शमर जोसेफ, ओबेद मॅककॉय, गुडाकेश मोती, निकोलस पूरन, शेरफेन रुदरफोर्ड, रोमॅरियो शेफर्ड.





