Team India : मोहम्मद शमी ‘या’ स्पर्धेतून करणार पुनरागमन, तब्बल 11 महिन्यांनंतर उतरणार मैदानात….

Mohammed Shami set to return in 2024-25 Ranji Trophy : घोट्याच्या शास्त्रक्रियेतून सावरत असलेला भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी रणजी करंडक स्पर्धेतून पुनरागमन करणार आहे. रणजी स्पर्धेत बंगालकडून खेळताना शमी उत्तर प्रदेश किंवा बिहार विरुद्धच्या लढतीत तो उतरणार आहे. दोन्ही लढतीमध्ये केवळ दोनच दिवसांचे अंतर असल्याने दोन्ही लढतींपैकी एका लढतीत शमी खेळण्याची शक्यता आहे.
ऑकटोबर महिन्यात न्यूझीलंड संघ भारताच्या दौऱ्यावर येणार आहे. यावेळी भारतीय संघ न्यूझीलंड तीन कसोटी लढती खेळणार आहे. यातील पहिली लढत 19 ऑक्टोबरपासून, दुसरी लढत 24 ऑक्टोबरपासून तर तिसरी लढत 1 नोव्हेंबर पासून सुरु होणार आहे. यानंतर भारतीय संघ ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यासाठी रवाना होणार आहे. त्यामुळे न्यूझीलंड विरुद्धच्या किमान एका लढतीत शमी सहभागी होण्याची शक्यता आहे.
ऑस्ट्रेलिया येथील उसळत्या खेळपट्टीवर शमी सारख्या वेगवान गोलंदाची भारतीय संघाला आवशयकता असल्याने शमीला राखून ठेवण्यात येण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षी शमी अहमदाबाद येथे ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या एकदिवसीय लढतीत खेळाला होता. त्यावेळी शमीच्या घोट्याला दुखापत झाली होती. शस्त्रक्रिया झाल्याने तो स्पर्धात्मक क्रिकेट खेळलेला नाही.
शमी सध्या बंगळूर येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये कमी रनअपसह गोलंदाजीचा सराव करत आहे. तो या महिन्यात होणाऱ्या दुलीप करंडक स्पर्धेसाठी देखील उपलब्ध असल्याची माहिती मिळाली आहे. मात्र अजूनही तो पूर्णपणे तंदुरुस्त नसल्याने निवडसमिती त्याच्या बाबतीत कोणतीही घाई करत नाही. आगामी ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या पाच कसोटी लढतीसाठी जसप्रीत बुमराह, मोहम्मद शामी व मोहम्मद सिराज हे तीन महत्वाचे गोलंदाज तंदुरुस्त असणे आवश्यक आहे. मोहम्मद शामीने आपले गोलंदाजीतील कौशल्य सिद्ध करताना आतापर्यंत 64 कसोटी सामन्यात 229 बळी घेतले आहेत.





