मी माझ्या नातवाला का संपवू? बंडू आंदेकराचा इमोशनल डाव; वकिलांचाही अजब दावा, कोर्टात काय घडलं?

Ayush Komkar murder case : पुणे शहरात गणेश विसर्जनाच्या आदल्या दिवशी गोविंद उर्फ आयुष कोमकर (वय १९) याची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. या घटनेने संपूर्ण शहरात मोठी खळबळ उडाली होती. नाना पेठ परिसरात त्याची हत्या करण्यात आली. या प्रकरणी पोलिसांनी एकूण सहा आरोपींना अटक केली असून या सहाही आरोपींना काल मंगळवारी कोर्टात हजर करण्यात आलं होतं. या खून प्रकरणाची सुनावली कोर्टात पार पडली. कोर्टाने दोन्ही बाजू ऐकून घेतल्यानंतर सहाही आरोपींना १५ सप्टेंबरपर्यंत आरोपींना पोलीस कोठडी सुनावली आहे. या सुनावणीत काय काय घडलं ते पाहूयात….
या प्रकरणात पोलिसांनी अटक केलेल्या बंडू आंदेकर याने आपल्याला या प्रकरणात गोवण्यात आल्याचा दावा केला आहे. आम्हाला खोट्या गुन्ह्यात अडकवलं जात आहे. आम्ही केरळला होतो. आमची पोलिसांच्या विरोधात काही तक्रार नाही. पण आम्हाला अडकवलं गेलं आहे, असं बंडू आंदेकरने कोर्टात म्हटलं आहे.
…म्हणून माझं नाव यात गोवलं गेलं आहे.
मी माझ्या नातवाचा खून का करू? मला काय मिळणार? आयुष माझा वैरी आहे का? मला मारायचं असतं तर प्रतिस्पर्धीला मारेन. वनराचे खूप फॉलोअर्स आहेत. तो लोकप्रिय होता. त्यापैकी कुणी मारलं असेल. त्याचे खूप फॅन आहेत, असा दावा बंडू आंदेकरने केला आहे. मी फिर्यादीच्या पतीचे, साऱ्याचे आणि नवऱ्याचे नाव घेतले आहे म्हणून माझं नाव यात गोवलं गेलं आहे. माझं संपूर्ण कुटुंब जेलमध्ये गेलं पाहिजे हाच यामागचा उद्देश आहे, असंही बंडू आंदेकरने कोर्टात म्हटलं आहे.
तपास अधिकाऱ्यांनी कोर्टात काय म्हणाले?
या खून प्रकरणाचा तपास करणाऱ्या अधिकाऱ्यांनी कोर्टात महत्वाची माहिती दिली. आयुष कोमकर खून प्रकरणात एकूण १३ जणांनी कट रचला होता. त्यापैकी दोघांनी आयुषवर पिस्तूलने फायरिंग करून खून केला. बाकीच्या आरोपींच्या सांगण्यावरून हा खून करण्यात आला. त्यामुळे पिस्तूल आम्हाला जप्त करायचं आहे, पिस्तूल आणि गोळ्या कुठून आणल्या याचा तपास करायचा आहे, असं तपास करणाऱ्या अधिकाऱ्यांनी कोर्टाला सांगितलं. इतर पाच आरोपी फरार आहे, त्यांचा पत्ता याच आरोपींना माहिती आहे त्यांना शोधायचं आहे याबाबत सखोल तपास करायचा आहे, असंही पोलिस अधिकारी कोर्टात म्हणाले आहेत.
हेही वाचा : Punjab Flood: “घर तुटलं पण हिम्मत नाही हारली ”… सोनू सूद पुन्हा धावले पूरग्रस्तांच्या मदतीला





