Mayor of Mumbai : येत्या काही दिवसांवर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार असल्याचे चित्र आहे. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांकडून जोरदार तयारी केली जात असून, निवडणुकीच्या दृष्टीने कंबर कसली आहे. मात्र, सगळ्यांचे लक्ष हे मुंबई महापालिकेकडे लागलेले आहे. मुंबई महापालिकेवर सत्ता कोणाची येणार? याची चर्चा सुरू झाली आहे. अशातच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते संदीप देशपांडे यांनी मुंबईचा महापौर हा मराठी आणि मनसेचा होणार असल्याचे मोठं विधान केले होते. यानंतर राजकीय प्रतिक्रिया समोर आल्या आहेत. कोण काय म्हणाले? Deshpande”, मुंबई महापालिकेवर सत्ता आणण्यासाठी राजकीय पक्षांकडून जोर लावला जाणार आहे. तशी तयारीही केली जात आहे. परंतु मनेसे नेते संदीप देशपांडे यांनी केलेल्या विधानानंतर मुंबईचा महापौर हा महायुतीचाच असेल, असे उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे प्रमुख एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे. तर उबाठाचीही प्रतिक्रिया समोर आली असून मुंबईचा महापौर कोण होणार हे मुंबईकर ठरवतील, अशी प्रतिक्रिया उबाठाच्या नेत्या आणि मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली आहे. बैठकांचा सिलसिला मुंबईसाठी सर्वच राजकीय पक्षांकडून बैठकांचा सिलसिल सुरू झाला आहे. दिवाळीनंतर आणखी गती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मिळणार आहे. शिंदेच्या शिवसेनेही निवडणुकीच्या दृष्टीने जोरदार तयारीला सुरूवात केली असून, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पदाधिकाऱ्यांची महत्वाची बैठक पार पडली. मतभेद बाजूला ठेवून जोमानं कामाला लागण्याच्या सूचना, एकनाथ शिंदे यांनी बैठकीत केल्या आहेत. एकनाथ शिंदेंकडून सूचना आपण ही निवडणूक महायुती म्हणून एकत्र लढवणार आहोत, असेही शिंदे यांनी म्हटले आहे. निवडणूक मतदार याद्यांवर काम करा. प्रत्येक वॉर्डातील वाढीव मतदारांची माहिती घ्या. मतदान प्रक्रिया आतापासूनच समजून घ्या. प्रत्येकाने एकनाथ शिंदे समजूनच कामाला लागा, अशा महत्वाच्या सूचनाही एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतील पदाधिकाऱ्यांना दिल्या आहेत. मनसे नेते संदीप देशपांडे नेमकं काय म्हणाले होते? मुंबईचा महापौर हा मराठीच होणार आणि मनसेचा होणार असल्याचा विश्वास संदीप देशपांडे यांनी व्यक्त केला. गेल्या काही दिवसांपूर्वी मुंबईत भारतीय जनता पार्टीचा मेळावा पार पडला होता. या मेळाव्यातून मुंबई शहराध्यक्ष अमित साटम यांनी मुंबईच्या महपौराबाबत विधान केले होते. आता देशपांडे यांनी महापौर पदाबाबत केलेल्या विधानामुळे राजकीय वर्तुळात चर्चा होत आहे. हेही वाचा : अफगाणिस्तानात इंटरनेट बंद, मोबाईल नेटवर्कही बंद ; तालिबान सरकारने धक्कादायक निर्णय का घेतला? वाचा