Kavya Maran Relationship : काव्या मारन भारतातील सर्वात महागड्या संगीतकाराला करतेय डेट? एका चित्रपटासाठी घेतो ‘तब्बल’ इतके कोटी

SRH Team Owner Kavya Maran dating with Anirudh Ravichander : आयपीएल २०२५च्या हंगामाला सुरुवात झाली असून या स्पर्धेत आतापर्यंत सात सामने खेळले गेले आहे. या संपूर्ण स्पर्धेती सामन्यात जर कॅमेरा जास्त वेळ कोणावर खिळून राहत असेल, तर ती व्यक्ती आहे. जी सनरायझर्स हैदराबाद संघाची मालकीन आहे. काव्या मारन ही सनरायझर्स हैदराबादच्या जवळ-जवळ सर्व सामन्याला उपस्थित असते, त्यामुळे सामन्यातील तिची प्रत्येक रिअॅक्शन कॅमेऱ्यात कैद करण्यासाठी कॅमेरामॅन आणि चाहते उत्सुक असतात. आता चाहते काव्या मारनचे रिलेशनशिप स्टेटस काय आहे? हे जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.
कोण आहे संगीतकार अनिरुद्ध रविचंदर?
सध्या काव्या मारनचे नाव संगीतकार अनिरुद्ध रविचंदरशी जोडले जात आहे. सोशल मीडियावर अशी चर्चा होती की दोघेही एकमेकांना डेट करत आहेत. अनिरुद्ध रविचंदर हा लोकप्रिय संगीत दिग्दर्शक आणि गायक आहे. तो दक्षिण चित्रपटसृष्टीतील एक प्रसिद्ध नाव आहे आणि त्याने तेलुगू आणि तमिळ चित्रपटांमध्ये संगीत दिले आहे. त्याने शाहरुख खानच्या ‘जवान’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आणि या चित्रपटाचे संगीत खूप लोकप्रिय झाले. त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचे झाले तर, अभिनेत्याचे नाव प्रसिद्ध उद्योगपती कलानिधी मारन यांची मुलगी काव्या मारनशी जोडले जात आहे. सनरायझर्स हैदराबादच्या सामन्यांदरम्यान काव्या अनेकदा स्टेडियममध्ये दिसते.
View this post on Instagram
अनिरुद्धच्या टीमने तो काव्या मारनला डेट करत असलेल्या बातम्यांचे खंडन केले आहे. त्याचबरोबर त्याच्या टीमने म्हटले की, तो आणि काव्या फक्त मित्र आहेत. विशेष म्हणजे याआधी अनिरुद्धचे नाव अभिनेत्री कीर्ती सुरेशशीही जोडले गेले आहे. गेल्या वर्षी २०२४ मध्ये, सोशल मीडियावर चर्चा होती की कीर्ती अनिरुद्धशी लग्न करत आहे. मात्र, ही फक्त अफवा असल्याचे निष्पन्न झाले आणि कीर्तीने तिचा प्रियकर अँटनी थाथिलशी लग्न केले.
हेही वाचा – SRH vs LSG : हात जोडले अन्…वाकून केला नमस्कार! संजीव गोयंकांनी शार्दुल ठाकूरला असा ठोकला सलाम, VIDEO व्हायरल
अनिरुद्ध रविचंदर हा सर्वाधिक मानधन घेणारा संगीतकार –
View this post on Instagram
अनिरुद्ध रविचंदर हा ज्येष्ठ अभिनेते रवी राघवेंद्र यांचा मुलगा आहे. १६ ऑक्टोबर १९९० रोजी जन्मलेला अनिरुद्ध रविचंदर पहिल्यांदा ‘व्हाय दिस कोलावेरी दी’ या गाण्याने लोकप्रिय झाला. अनिरुद्ध हा भारतातील सर्वाधिक मानधन घेणारा संगीतकार आहे. हिंदुस्तान टाईम्सच्या वृत्तानुसार, शाहरुख खानच्या ‘जवान’ चित्रपटात संगीत देण्यासाठी त्याने १० कोटी रुपये घेतले होते. फीच्या बाबतीत त्याने ए.आर. रहमान आणि प्रीतमला मागे टाकले आहे. मीडिया रिपोर्टनुसार रहमान ७-८ कोटी रुपये फी घेतो. डीएनएच्या वृत्तानुसार, प्रीतम एका चित्रपटासाठी ५ कोटी रुपये घेतो. त्यानी कमल हासन, थलापती विजय, रजनीकांत यांच्या नावांसह प्रत्येक मोठ्या स्टारच्या चित्रपटांना संगीत दिले आहे.





