Kavya Maran Wedding : SRHच्या मालकीणबाईं प्रसिद्ध संगीतकाराशी बांधणार लग्नगाठ! सीएमओच्या पोस्टमुळे झाला शिक्कामोर्तब
Kavya Maran Wedding : सनरायझर्स हैदराबाद संघाची सहमालक काव्या मारन आणि प्रसिद्ध संगीतकार लवकरच विवाहबंधनात अडकणार आहेत.

Kavya Maran and Anirudh Ravichander Wedding Reception in Chennai on November 21 : आयपीएलमधील सनरायझर्स हैदराबाद संघाची सहमालक काव्या मारन आणि प्रसिद्ध संगीतकार अनिरुद्ध रविचंदर लवकरच विवाहबंधनात अडकणार आहेत. या बहुचर्चित विवाहसोहळ्याची देशभरात जोरदार चर्चा सुरू असून, लग्नसोहळ्याच्या रिसेप्शनसाठी देशातील बड्या राजकीय नेत्यांना प्रत्यक्ष भेटून निमंत्रण देण्यात येत आहे. सन ग्रुपचे अध्यक्ष कलानिधी मारन आणि त्यांच्या पत्नी कावेरी मारन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, तेलंगणाचे मुख्यमंत्री ए. रेवंत रेड्डी आणि तमिळनाडूचे मुख्यमंत्री जोसेफ विजय यांची भेट घेऊन त्यांना या शाही सोहळ्याचे निमंत्रण दिले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींना प्रत्यक्ष भेटून निमंत्रण –
चेन्नईमध्ये २१ नोव्हेंबर रोजी हा भव्य रिसेप्शन सोहळा आयोजित करण्यात येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निमंत्रण देण्यासाठी कलानिधी मारन आणि कावेरी मारन यांनी अनिरुद्धचे आई-वडील, अभिनेते रवी राघवेंद्र आणि लक्ष्मी रविचंदर यांच्यासह भेट घेतली. याशिवाय मारन दाम्पत्याने अनिरुद्धच्या उपस्थितीत तमिळनाडूचे मुख्यमंत्री जोसेफ विजय यांचीही भेट घेऊन त्यांना या खास कार्यक्रमासाठी आग्रहाचे निमंत्रण दिले. या सोहळ्याला राजकीय क्षेत्रासह चित्रपट आणि क्रिकेट जगतातील अनेक दिग्गज उपस्थित राहणार आहेत.
तेलंगणा मुख्यमंत्र्यांच्या पोस्टमुळे तारखेवर शिक्कामोर्तब –
Sun Group Chairman Shri Kalanithi Maran and his wife, Smt. Kavery Maran, met Hon’ble Chief Minister Shri A. Revanth Reddy at his residence in Jubilee Hills and invited him to the wedding reception of their daughter, Kavya Maran.
The wedding reception of Kavya Maran and Anirudh Ravichander is scheduled to be held in Chennai on November 21.
#KalanithiMaran #KavyaMaran— Telangana CMO (@TelanganaCMO) October 16, 2026
तेलंगणा मुख्यमंत्री कार्यालयाने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर अधिकृत पोस्ट शेअर करत या भेटीची माहिती दिली आहे. कलानिधी मारन आणि कावेरी मारन यांनी जुबली हिल्स येथील निवासस्थानी मुख्यमंत्री ए. रेवंत रेड्डी यांची भेट घेऊन कन्या काव्या मारन हिच्या लग्नाच्या रिसेप्शनचे निमंत्रण दिल्याचे त्यात स्पष्ट करण्यात आले. या पोस्टमुळे २१ नोव्हेंबर रोजी चेन्नईत रिसेप्शन होणार असल्याच्या बातमीवर अधिकृत मोहोर उमटली आहे.
११ नोव्हेंबरला ग्रीसमध्ये लग्नसोहळा? चर्चांना उधाण –
அழைப்பு
முதலமைச்சர் சி. ஜோசப் விஜயை சந்தித்து, காவியா கலாநிதி மாறன் – அனிருத் ரவிச்சந்தர் திருமண வரவேற்பு விழா அழைப்பிதழை வழங்கினார் சன் டிவி குழுமத் தலைவர் கலாநிதி மாறன். காவேரி கலாநிதி, அனிருத் ரவிச்சந்தர் உடன் இருந்தனர்.
#SunNews | #KaviyaMaran | #Anirudh | #Vijay
— Sun News (@sunnewstamil) October 17, 2026
चेन्नईतील रिसेप्शनची तारीख समोर आली असली, तरी ११ नोव्हेंबर रोजी ग्रीसमध्ये हा विवाहसोहळा पार पडणार असल्याच्या चर्चांना अद्याप दोन्ही कुटुंबीयांकडून अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. काव्या आणि अनिरुद्ध यांच्या नात्याची चर्चा गेल्या काही वर्षांपासून रंगत होती, मात्र जून २०२५ मध्ये अनिरुद्धने अशा चर्चा अफवा असल्याचे सांगत फेटाळून लावले होते. आता मात्र थेट मुख्यमंत्र्यांच्या पोस्टमुळे या लग्नसोहळ्याची खरी बातमी समोर आल्याने चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे.





