Kavya Maran Video : “हा फेकतोय का?”; क्रृणाल पंड्याच्या ‘त्या’ बॉलवर भडकली काव्या मारन; स्टँड्समधील रिअॅक्शनचा VIDEO व्हायरल
Kavya Maran Video : आरसीबीविरुद्धच्या सामन्यादरम्यान सनरायझर्स हैदराबादची मालकीण काव्या मारनचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये ती कृणाल पंड्याच्या गोलंदाजीच्या अॅक्शनवर संतापलेली दिसत आहे.

Kavya Maran Krunal Pandya Chucking Video Viral : आयपीएल २०२६ मधील शुक्रवारी (२२ मे) झालेल्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादने आरसीबीवर ५५ धावांनी विजय मिळवला. या विजयासह हैदराबादने १८ गुणांसह गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर राहून लीग स्टेजचा प्रवास संपवला आहे. परंतु दुर्दैवाने त्यांना ‘टॉप-२’ मध्ये स्थान मिळवता आले नाही. दरम्यान, या सामन्यात सनरायझर्स हैदराबादची मालकीण काव्या मारनचा एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये ती आरसीबीचा फिरकीपटू क्रृणाल पंड्याच्या बॉलिंग अॅक्शनवर तीव्र आक्षेप घेताना दिसत आहे. (Kavya Maran Video)
क्रृणालच्या अॅक्शनची नक्कल करत विचारला थेट प्रश्न! (Kavya Maran Video)
व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये काव्या मारन थेट क्रृणाल पंड्याची गोलंदाजी ‘चकिंग’ (फेकतोय) म्हणजे नियमबाह्य अॅक्शन असल्याचे म्हणत असल्याचा दावा नेटकर्यांकडून केला जात आहे. या व्हिडीओमध्ये स्टँड्समधील गोंगाटामुळे काव्याचा आवाज ऐकू येत नसला, तरी तिच्या ओठांच्या हालचाली (Lip-sync) आणि चेहऱ्यावरील हावभावावरून ती क्रुणालच्या बॉलिंग अॅक्शनवर प्रचंड नाराज असल्याचे स्पष्ट दिसत आहे. क्रिकेटच्या नियमांनुसार ‘चकिंग’ ही अत्यंत गंभीर आणि बेकायदेशीर गोष्ट मानली जाते, त्यामुळे या दाव्याने सोशल मीडियावर वाद पेटवला आहे.
१७ व्या षटकात रंगला हाय-व्होल्टेज ड्रामा! (Kavya Maran Video)
Like many have questioned before, Kavya Maran also looks uncertain about Krunal Pandya’s action.
How is he generating that much bounce without chucking? His action should be checked if RCB is qualified for the finals pic.twitter.com/1BWRhPfjqY
— Brutal Truth (@sarkarstix) May 22, 2026
हा सर्व ड्रामा सामन्याच्या पूर्वार्धातच सुरू झाला. हेनरिक क्लासेन नवव्या षटकात फलंदाजीला आल्यानंतर आरसीबीने क्रृणाल पंड्याला गोलंदाजीला आणले होते. आपल्या पहिल्याच षटकात क्रुणालला एक षटकार पडला आणि त्याने ८ धावा दिल्या. त्यामुळे त्याला लगेच गोलंदाजीवरून हटवण्यात आले. यानंतर थेट १७ वे षटक टाकण्यासाठी क्रुणाल पुन्हा परतला. या षटकात त्याने धोकादायक ठरणाऱ्या आणि अर्धशतक झळकावलेल्या हेनरिक क्लासेनला बाद करत आरसीबीला मोठे यश मिळवून दिले.
मात्र, क्लासेन बाद झाल्यावर मैदानात आलेल्या नितीश कुमार रेड्डीने क्रुणालला अजिबात थारा दिला नाही आणि त्याला सलग दोन गगनचुंबी षटकार ठोकले. या षटकातील शेवटचा चेंडू पडल्यानंतर कॅमेरा व्हीआयपी स्टँड्सकडे फिरला आणि तिथे काव्या मारनची ही धक्कादायक प्रतिक्रिया कॅमेऱ्यात कैद झाली. या एका रिएक्शनने आता सर्वत्र खळबळ उडवून दिली आहे. (Kavya Maran Video)





