Sunil Gavaskar Slams : ‘हे भारतीय सैनिकांच्या मृत्यूमध्ये योगदान देण्यासारखे…’, पाक खेळाडूच्या खरेदीवरून गावस्करांनी काव्या मारनला सुनावलं
Sunil Gavaskar Slams : भारताचे दिग्गज माजी क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांनी उडी घेतली असून त्यांनी फ्रँचायझीच्या या निर्णयावर अत्यंत कठोर शब्दांत टीका केली आहे.

Sunil Gavaskar slams Kavya Maran for Abrar Ahmed : ‘द हंड्रेड’ लीगच्या लिलावात सन ग्रुपच्या मालकीच्या ‘सनरायझर्स लीड्स‘ या संघाने पाकिस्तानचा फिरकीपटू अबरार अहमदला २.३ कोटी रुपयांना (१ लाख ९० हजार पाउंड) विकत घेतले. या खरेदीमुळे सनरायझर्सच्या मालकीण काव्या मारन सध्या सोशल मीडियावर चाहत्यांच्या निशाण्यावर आल्या आहेत. मात्र, या वादात आता भारताचे दिग्गज माजी क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांनी उडी घेतली असून त्यांनी फ्रँचायझीच्या या निर्णयावर अत्यंत कठोर शब्दांत टीका केली आहे. Sunil Gavaskar Slams
“हा भारतीयांच्या मृत्यूतील वाटा” – गावस्करांचे रोखठोक मत Sunil Gavaskar Slams
सुनील गावस्कर यांनी ‘मिड-डे’ मधील आपल्या कॉलममध्ये लिहिले की, “पाकिस्तानी खेळाडूंना दिले जाणारे पैसे हे अप्रत्यक्षपणे भारतीय सैनिकांच्या मृत्यूमध्ये योगदान देण्यासारखे आहे. हे खेळाडू आपल्या उत्पन्नातून त्यांच्या सरकारला टॅक्स देतात आणि याच पैशातून भारताच्या विरोधात वापरली जाणारी शस्त्रे खरेदी केली जातात. त्यामुळेच भारतात पाकिस्तानी कलाकार आणि खेळाडूंना बोलावणे बंद करण्यात आले आहे.” Sunil Gavaskar Slams
फ्रँचायझी मालकांना समजायला हवे होते! Sunil Gavaskar Slams
Sunil Gavaskar has criticised the Indian-owned franchise Sunrisers Leeds for signing Abrar Ahmed in the The Hundred Draft.
Gavaskar said that money paid to players from Pakistan could indirectly contribute to the deaths of Indian soldiers and civilians, expressing strong… pic.twitter.com/egKRfqqkuR
— Cricketopia (@CricketopiaCom) March 16, 2026
गावस्कर यांनी पुढे स्पष्ट केले की, कंपनी भारतीय असो किंवा तिची परदेशी उपकंपनी असो, जर मालक भारतीय असेल तर त्यांनी अशा संवेदनशील बाबींचा विचार करायला हवा होता. सनरायझर्सचे प्रशिक्षक डॅनियल व्हिटोरी यांना भारतीय भावनांची कल्पना नसेल, परंतु काव्या मारन यांनी हे समजून घ्यायला हवे होते, असेही गावस्कर यांनी नमूद केले. Sunil Gavaskar Slams
२००८ च्या मुंबई हल्ल्यानंतर आयपीएलमध्ये (IPL) पाकिस्तानी खेळाडूंवर बंदी घालण्यात आली होती. त्यानंतर पुलवामा आणि २०२५ मधील पहलगाम येथील हल्ल्यांमुळे भारत आणि पाकिस्तानमधील क्रिकेट संबंध अधिक ताणले गेले आहेत. अशा परिस्थितीत भारतीय मालकीच्या संघाने घेतलेला हा निर्णय देशवासीयांच्या भावना दुखावणारा ठरत आहे.






