Kavya Maran Rose : हैदराबादचा विजय अन् काव्या मारन ‘क्लीन बोल्ड’! भर गर्दीत चाहत्याने दिलं गुलाबाचं फूल, पाहा VIDEO
Kavya Maran Rose : सुरक्षारक्षकांचे कडे तोडून या चाहत्याने काव्याच्या दिशेने गुलाब सरकवले. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे काव्या मारन क्षणभर थक्क झाली.

Kavya Maran Rose Viral Video : आयपीएलच्या मैदानात खेळाडूंच्या चौकार-षटकारांइतकीच चर्चा असते ती सनरायझर्स हैदराबादची (SRH) मालकीण काव्या मारन हिची. राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या रोमांचक विजयानंतर काव्या मारन पुन्हा एकदा सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरली आहे. मात्र, यावेळी चर्चेचे कारण तिचे हावभाव नसून एका चाहत्याने तिला दिलेली खास भेट आहे. ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
सनरायझर्स हैदराबादने राजस्थान रॉयल्सवर निसटता विजय मिळवल्यानंतर स्टेडियममध्ये आनंदाचे वातावरण होते. सामना संपल्यानंतर काव्या मारन स्टेडियममधून बाहेर पडत असताना एक रंजक प्रसंग घडला. काव्या आपल्या ताफ्यासह लिफ्टच्या दिशेने जात असताना एका चाहत्याने गर्दीतून तिच्याजवळ जाण्याचा प्रयत्न केला. या चाहत्याच्या हातात निळा गुलाब होता.
अनपेक्षित भेटीने काव्या थक्क –
A fan gave Kavya Maran flowers to congratulate her.
– Kavya smiled and took them from the fan. ❤️ pic.twitter.com/bd12Ej7FHk
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) April 14, 2026
सुरक्षारक्षकांचे कडे तोडून या चाहत्याने काव्याच्या दिशेने गुलाब सरकवले. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे काव्या मारन क्षणभर थक्क झाली. मात्र, तिने परिस्थिती अत्यंत संयमाने हाताळली. कोणताही राग न व्यक्त करता तिने अतिशय नम्रपणे हसून त्या चाहत्याचे गुलाब स्वीकारले. काव्याच्या या साधेपणाने आणि ‘डाऊन टू अर्थ’ स्वभावाने उपस्थित असलेल्या सर्वांचीच मने जिंकली. त्यानंतर सुरक्षारक्षकांनी चाहत्याला बाजूला केले, पण हा गोड प्रसंग कॅमेऱ्यात कैद झाला.
सोशल मीडियावर कमेंट्सचा पाऊस –
या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताच नेटकऱ्यांनी त्यावर मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत. “हैदराबादने सामना जिंकला, पण या चाहत्याने काव्याचे मन जिंकले,” अशी कमेंट एका युजरने केली आहे. काव्या मारन ही तिच्या उत्साही स्वभावामुळे आधीच ‘नॅशनल क्रश’ म्हणून ओळखली जाते, आता या नव्या व्हिडिओमुळे तिच्या चाहत्यांच्या संख्येत आणखी भर पडली आहे. विजयाच्या आनंदात काव्याने चाहत्याला दिलेला हा प्रतिसाद सध्या इंटरनेटवर तुफान ट्रेंड होत आहे.





