Vidyanand bapat : विद्यानंद बापट यांना मारहाण करणारा तरुण नेमका कोण? हल्लेखोराने सांगितलं कारण, पाहा….
विद्यानंद बापट यांच्यासहित इतर पुणेकरांकडून डीजेला विरोध केला जात आहे. यावरून पुण्यात चांगलाच वाद पेटला आहे. अशातच डीजेच्या विरोधात आवाज उचलणाऱ्या विद्यानंद बापट यांना मारहाण झाल्याची घटना घडली आहे.

vidyanand bapat : पुण्यात डीजे बंदीच्या मागणीवरून दोन गट पडले आहेत. गणेश मंडळातील तरुणांकडून डीजे सुरू राहावा, अशी मागणी केली जात आहे. तर विद्यानंद बापट यांच्यासहित इतर पुणेकरांकडून डीजेला विरोध केला जात आहे. यावरून पुण्यात चांगलाच वाद पेटला आहे. अशातच डीजेच्या विरोधात आवाज उचलणाऱ्या विद्यानंद बापट यांना मारहाण झाल्याची घटना घडली आहे. (Vidyanand bapat)
विद्यानंद बापट यांना मारहाण करणारा नेमका कोण? (Vidyanand bapat)
विद्यानंद बापट यांना मारहाण करणाऱ्या व्यक्तीचे नाव ‘संतोष चव्हाण’ असून तो पुण्यातील कोथरूड परिसरातील राऊतवाडी येथील रहिवासी असल्याचे सांगितले जात आहे. तो एका बांधकाम व्यावसायिकाकडे कामाला असल्याचीही माहिती आहे.
राऊतवाडी येथील प्रियदर्शनी गणेश मंडळाचा तो माजी अध्यक्ष असल्याचेही सांगितले जात आहे. गणेशप्रेमी असलेल्या संतोष चव्हाणने बापट यांच्यावर हल्ला नेमका का केला? यामागचं कारण त्यांनी सांगितलं आहे.
संतोष चव्हाण हा फरार असून पोलिसांकडून शोध सुरू आहे. विद्यानंद बापट यांच्यावर हल्ला झाल्यानंतर राजकीय वातावरण तापलं आहे. बापट यांच्या हल्ल्याचा सत्ताधाऱ्यांसह विरोधी पक्षाच्या नेत्यांकडून निषेध नोंदवला जात आहे.
संतोष चव्हाण नेमकं काय म्हणाले…. (Vidyanand bapat)
संतोष चव्हाण एका व्हिडिओमध्ये म्हटले की, ‘गणेशोत्सवात डीजे आणि ढोल ताशामुळे नागरिकांना त्रास होतो. त्यामुळे गणेशोत्सव पारंपारिक पद्धतीने साजरा करण्याचा सल्ला दिला जात आहे. डीजे आणि ढोलताशा वाजवू नये, अशी मागणी केली जात आहे. एक पुणेकर म्हणून पुण्याची खरी परिस्थिती सांगू इच्छित आहे.
पुण्यात एक खासदार, आठ आमदार, 165 नगरसेवक आहेत. वास्तव काय आहे? ठराविक नेते सोडले, तर कोणी नेते मंडळाच्या बाजूने ठामपणे बोलताना दिसत नाही. एखादा कोणी बोलले तर स्पष्ट भूमिका समजत नाही. मंडळाच्या बाजूने बोलताय की विरोधात बोलताय, हेच समजत नाही.
कार्यकर्ते प्रचारासाठी दिवसाची रात्र करतात. मंडळाच्या बैठक घेतात. रक्तदान शिबीराचं आयोजन करतात. वेगवेळे उपक्रम घेत असतात. कोरोनाच्या काळात प्रत्येक कार्यकर्त्याने दिवसाची रात्र केली आहे.
ज्यांना कोरोना झाला, त्यांना रुग्णालयात नेण्याची गरज असूदे…प्रत्येक गोष्टी मंडळाच्या कार्यकर्त्याने केल्या आहेत. मंडळावर संकट येते, त्यावेळी एकही नेता येत नाही. आम्ही फक्त निवडणुकीसाठीच आहे का? कार्यकर्ता म्हणून वाईट वाटत आहे. अशी भूमिका संतोष चव्हाण यांनी मांडली आहे.
आयुक्त अमितेश कुमार नेमकं काय म्हणाले?
विद्यानंद बापट यांची तक्रार नोंद करून घेत आहे तक्रारी नुसार त्यांच्यावर दाखल गुन्हा नोंद करण्यात येणार आहे, आरोपीला उद्या कोर्टात दाखल करून पोलीस कस्टडी मागणार आहे.
या घटनेकडे गांभीर्याने पाहिलं गेलं आहे अश्या कडक कारवाई करण्याची भूमिका पोलिसांची आहे. तसेच विद्यानंद बापट यांना सुरक्षा प्रदान करण्यात आली आहे.
सर्व गणेश मंडळांनी या घटनेची एकमताने निंद केलेली आहे अशी घटना पुन्हा होऊ नये याबाबत गणेश मंडळा सोबत चर्चा झाली असल्याचं पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितलं आहे.






