Nilesh Rane | Ravindra Chavan | २ डिसेबंरला होणाऱ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोकणातील सिंधूदुर्ग जिल्ह्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. कणकवली नगरपरिषद निवडणुकीसाठी भाजप आणि शिवसेना पक्ष स्वतंत्र लढत आहेत. दोन्ही पक्षातील उमेदवारांच्या प्रचारार्थ बडे नेते मैदानात उतरले आहेत. अशातच स्टींग अॅापरेशन करत शिवसेना नेते आमदार निलेश राणे यांनी बेहिशोबी तब्बल २५ लाख रुपये मालवणमधील भाजप पदाधिकाऱ्याच्या घरी सापडल्याचे समोर आणले आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर एवढी मोठी रक्कम सापडल्याने अनेक प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत. शिवसेना पक्षाचे नेते आमदार निलेश राणे यांनी स्टींग अॅापरेशन करत मालवणमधील भाजपाचे पदाधिकारी विजय किंजवडेकर यांच्या राहत्या घरी धाड टाकली. किंजवडेकर यांच्या घरी बेहिशोबी 25 लाख रुपये मिळाले. एका खोलीत हिरव्या रंगाच्या पिशवीत हे पैसे असल्याचे दिसून आले. राणे ज्यावेळी या घरात गेले तेथील व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या घटनेनंतर आता आमदार निलेश राणे यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. तर त्यांच्या आरोपांवर रवींद्र चव्हाण यांनी देखील प्रत्युत्तर दिले आहे. निलेश राणेंचा गंभीर आरोप भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण ज्या ज्या वेळी जिह्यात येतात, तेव्हा वेगळं वातावरण करतात. काल रवींद्र चव्हाण मालवणमध्ये आले ते सहज आले नव्हते, त्यांच्यावर माझा संशय होता. मालवणमध्ये 6 ते 7 घर आहेत तिथे रोज पैशांच्या बॅग येतात. भाजपचे कार्यकर्ते तिथून येऊन घेऊन जातात, असा गंभीर आरोप निलेश राणे यांनी केला आहे. बाहेरुन आलेल्या लोकांनी ही संस्कृती आणली आहे, अशी टीका देखील निलेश राणे यांनी रवींद्र चव्हाण यांच्यावरी केली आहे. रवींद्र चव्हाणांचे प्रत्युत्तर निलेश राणे यांनी केलेल्या टीकेवर तसेच आरोपांवर प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी प्रतिक्रिया दिली आहे. या निवडणुकीत गेले 5 ते 6 दिवस झाले विरोधकांच्या पायाखालची वाळू घसरली आहे. कालच मी मालवणमध्ये जावून आलो आहे. तिथे आमचे नेते नारायण राणे, नितेश राणे यांच्या नेतृत्वाखालील केलेले काम योग्य आहे, असे चव्हाण म्हणाले. सुरुवात कुठून झाली तर भाजपाने युती का केली नाही म्हणून, कोणत्याही कार्यकर्त्याला व्यावसायिक म्हणून काम करण्याचा अधिकार नाही का? असा सवाल रवींद्र चव्हाण यांनी उपस्थित केला आहे. ज्या कार्यकर्त्यांनी तुम्हाला निवडून आणलं, त्या कार्यकर्त्यांच्या घरी अशा पद्धतीने काम करणे हे चांगले नाही, असा टोला मालवण पैसे पकडले प्रकरणात भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी निलेश राणे यांना लगावला आहे. मात्र, या घटनेनंतर पुन्हा एकदा भाजप आणि शिवसेना यांच्यातील संघर्ष वाढताना दिसत आहे. गेल्या काही दिवसांपूर्वीच निलेश राणे यांनी युतीबाबात विधान करताना रवींद्र चव्हाण यांना युती नको होती, असा आरोप केला होता. त्यानंतर समोर आलेल्या या प्रकरणामुळे अनेक सवाल उपस्थित झाले आहेत. रोहित पवारांची प्रतिक्रिया समोर हे प्रकरण समोर आल्यानंतर आता विविध नेत्यांच्या प्रतिक्रिया समोर यायला सुरूवात झाली आहे. शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी मालवण पैसे पकडणे प्रकरणावर भाष्य केले आहे. निवडणुका जिंकण्यासाठी वारेमाप पैशाचा वापर करणाऱ्या भाजपाचा खरा चेहरा पुराव्यासह उघड केल्याबद्दल शिवसेना नेते आमदार निलेश जी राणे यांचे मनापासून आभार! हेही वाचा : व्हाईट हाऊसजवळ गोळीबार! नॅशनल गार्डचे दोन सैनिक जखमी ; एका संशयिताला अटक