Virat Kohli Post : “…तेव्हाच तुम्ही खऱ्या अर्थाने हरता”, विराटच्या क्रिप्टिक पोस्टने चाहत्यांमध्ये विश्वचषक खेळण्याबाबत संभ्रम

Virat Kohli Post Vira on Social Media : भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार विराट कोहली ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी संघासह पर्थ येथे दाखल झाला आहे. 19 ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या या मालिकेपूर्वी विराट कोहली आणि रोहित शर्माच्या कारकिर्दीवर तसेच 2027 च्या एकदिवसीय विश्वचषक जिंकण्याच्या शक्यतांवर जोरदार चर्चा सुरू आहे. या चर्चांदरम्यान, पर्थ येथे पोहोचताच विराट कोहलीने एक क्रिप्टिक पोस्ट शेअर करून सर्वांचे लक्ष वेधले आहे. ज्यामुळे वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे.
विराट कोहली शेवटचा मार्च 2025 मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात खेळताना दिसला होता. तब्बल सहा महिन्यांच्या विश्रांतीनंतर तो आता पुन्हा मैदानावर उतरण्यास सज्ज आहे. 16 ऑक्टोबरच्या पहाटे विराट आणि रोहितसह भारतीय संघ पर्थ येथे दाखल झाला. यावेळी त्यांचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
विराटची क्रिप्टिक पोस्ट: निवृत्तीच्या चर्चांना उधाण –
The only time you truly fail, is when you decide to give up.
— Virat Kohli (@imVkohli) October 16, 2025
पर्थ येथे पोहोचल्यानंतर विराट कोहलीने एक्सवर एक क्रिप्टिक पोस्ट शेअर केली, ज्याने सर्वांचे लक्ष वेधले. त्याने लिहिले, “जेव्हा तुम्ही प्रयत्नांची साथ सोडता, तेव्हाच तुम्ही खऱ्या अर्थाने हरता.” या पोस्टमुळे त्याच्या निवृत्तीच्या चर्चांना पुन्हा एकदा हवा मिळाली आहे. कसोटी आणि टी-20 क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेला कोहली आता फक्त एकदिवसीय क्रिकेट खेळतो. काही चाहते आणि क्रिकेट तज्ञ ही पोस्ट त्याच्या क्रिकेट कारकिर्दीतील पुनरागमनाचे संकेत मानत आहेत, तर काहीजण याला त्याच्या निवृत्तीच्या दिशेने पाऊल म्हणून पाहत आहेत.
हेही वाचा – Virat Kohli : ऑस्ट्रेलिया दौऱ्यापूर्वी विराट कोहलीचा मोठा निर्णय! ‘या’ व्यक्तीच्या नावावर केली मालमत्ता
प्रॉपर्टी हस्तांतरणाचा मोठा निर्णय –
ऑस्ट्रेलिया दौऱ्यापूर्वी विराट कोहलीने भारतातील एक मालमत्ता आपल्या भावाच्या नावे केल्याची माहिती समोर आली आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धची ही एकदिवसीय मालिका त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील शेवटची मालिका असू शकते, अशीही चर्चा आहे. 36 वर्षीय कोहलीच्या या पोस्टमुळे चाहत्यांमध्ये तो 2027 चा विश्वचषक खेळेल, अशी आशा निर्माण झाली आहे. सर्वांचे लक्ष आता त्याच्या फिटनेस आणि फॉर्मवर आहे, कारण हा ऑस्ट्रेलिया दौरा त्याच्यासाठी निर्णायक ठरू शकतो. चाहते कोहलीला त्याच्या जुन्या आक्रमक शैलीत वादळी फलंदाजी करताना पाहण्यास उत्सुक आहेत.
हेही वाचा – IND vs AUS : विराट-रोहित यांच्याकडे मोठी संधी! ऑस्ट्रेलियन जोडीला मागे टाकण्यासाठी फक्त ‘इतक्या’ धावांची गरज
आयपीएलमधील विजय आणि निवृत्ती –
ऑस्ट्रेलियातील बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमधील निराशाजनक कामगिरीनंतर, कोहलीने मे 2025 मध्ये आयपीएल 2025 च्या हंगामात कसोटी आणि टी-20 मधून निवृत्ती जाहीर केली होती. विशेष म्हणजे, याच हंगामात त्याने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूसह आपल्या कारकिर्दीतील पहिले आयपीएल विजेतेपद मिळवले. आता एकदिवसीय क्रिकेटमधील त्याची कामगिरी आणि 2027 विश्वचषकातील सहभाग याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.





