Raja Muthupandi Silver : ग्लास्गोत भारताची ‘मेडल एक्स्प्रेस’ सुसाट; राजा मुथुपंडीच्या सिल्व्हरसह भारताला चौथे पदक
Raja Muthupandi Silver : २६ वर्षीय भारतीय भारोत्तोलक (वेटलिफ्टर) राजा मुथुपंडीने पुरुषांच्या ६५ किलो वजनी गटात रौप्य पदकावर आपले नाव कोरले आहे.

Raja Muthupandi Wins Silver Medal Weightlifting Glasgow CWG 2026 : स्कॉटलंडमधील ग्लास्गो येथे सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत (Commonwealth Games 2026) भारतीय वेटलिफ्टर्सचा दबदबा कायम आहे. २६ वर्षीय भारतीय भारोत्तोलक (वेटलिफ्टर) राजा मुथुपंडी (Raja Muthupandi) याने पुरुषांच्या ६५ किलो वजनी गटात रौप्य पदकावर (Silver Medal) आपले नाव कोरले आहे. मुथुपंडीने एकूण २८६ किलोग्राम वजन उचलून हा पराक्रम केला. या स्पर्धेतील भारताचे हे एकूण चौथे पदक ठरले असून, यामुळे भारत पदक तालिकेत (Medal Tally) आता सातव्या स्थानावर पोहोचला आहे. (Raja Muthupandi Silver)
दुखापतीच्या गर्तेतून थेट राष्ट्रकुलचे पोडियम – (Raja Muthupandi Silver)
राजा मुथुपंडीचा हा विजय अत्यंत भावूक आणि प्रेरणादायी आहे. २०१९ मध्ये कोपराच्या गंभीर दुखापतीमुळे त्याचे क्रीडा करिअर संपण्याच्या मार्गावर होते. याच दुखापतीमुळे तो २०२२ च्या बर्मिंघम राष्ट्रकुल स्पर्धेलाही मुकला होता. मात्र, ६५ किलो वजनी गट सुरू झाल्यानंतर त्याने भारतीय संघात दमदार पुनरागमन केले. २०२५ च्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत त्याने २९९ किलो वजन उचलून कारकिर्दीतील सर्वोत्तम कामगिरीसह नववे स्थान मिळवले होते.
Another lift. Another medal. 🥈
Raja Muthupandi muscles his way to Commonwealth Games silver in the Men’s 65kg event. 🏋️♂️
Watch the Commonwealth Games 2026 TODAY, 2 PM onwards, LIVE & EXCLUSIVE on Sony Sports Network TV channels and Sony LIV
#SonySportsNetwork #SonyLIV… pic.twitter.com/SUTs7cv1mH
— Sony Sports Network (@SonySportsNetwk) July 26, 2026
आता राष्ट्रकुलमध्ये त्याने स्नॅच फेरीत १२६ किलो आणि क्लीन अँड जर्क फेरीत १६० किलो असे एकूण २८६ किलो वजन यशस्वीरीत्या उचलून रौप्यपदक पटकावले. यात मलेशियाच्या अजनील बिन बिदिन मोहम्मदने २९९ किलोचा विक्रम करत सलग तिसरे सुवर्णपदक जिंकले. (Raja Muthupandi Silver)
चौथ्या दिवशी भारताची मेडलची ‘हॅटट्रिक’ – (Raja Muthupandi Silver)
Proud Moment for Indian Weightlifting!
Many congratulations to Raja Muthupandi for clinching Silver in Men’s 65kg Weightlifting. #Cheer4Bharat #CWG2026 pic.twitter.com/qjldVR9ja5
— Dr Mansukh Mandaviya (@mansukhmandviya) July 27, 2026
स्पर्धेचा चौथा दिवस भारतासाठी कमालीचा ठरला असून या एकाच दिवशी भारताला ३ पदके मिळाली. मुथुपंडीच्या आधी स्टार मीराबाई चानूने (४८ किलो) सुवर्ण आणि चनंबम ऋषिकांत सिंहने (६० किलो) रौप्यपदक जिंकले. तर दुसऱ्या दिवशी पॅरा-पॉवरलिफ्टिंगमध्ये झंडू कुमारने कांस्यपदक पटकावले होते. भारताच्या खात्यात आता १ सुवर्ण, २ रौप्य आणि १ कांस्य अशी एकूण ४ पदके जमा झाली आहेत. पदक तालिकेत १२ सुवर्णांसह एकूण २४ पदके जिंकून ऑस्ट्रेलिया अव्वल स्थानी कायम आहे.





