Esha Singh Gold : शूटिंग वर्ल्डकपमध्ये भारताचा डबल धमाका! ईशा सिंगने सुवर्णपदकावर अन् मनू भाकरने कांस्यपदकावर कोरलं नाव
Esha Singh Gold : महिलांच्या २५ मीटर पिस्तूल प्रकारात भारताची स्टार नेमबाज ईशा सिंगने सुवर्णपदकावर आणि मनू भाकरने कांस्यपदकावर आपले नाव कोरले.

Esha Singh Gold Manu Bhaker Bronze Medal Wins ISSF World Cup Hangzhou China 25m Pistol : चीनमधील हांगझोउ येथे सुरू असलेल्या आयएसएसएफ (ISSF) नेमबाजी विश्वचषक स्पर्धेत भारतीय नेमबाजांनी यजमान चीनचा धुव्वा उडवत ऐतिहासिक कामगिरी केली आहे. सोमवार, २७ जुलै रोजी झालेल्या महिलांच्या २५ मीटर पिस्तूल प्रकारात भारताची स्टार नेमबाज ईशा सिंगने (Esha Singh) सुवर्णपदकावर (Gold Medal) आपले नाव कोरले.
याच स्पर्धेत पॅरिस ऑलिम्पिक पदकविजेत्या मनू भाकर (Manu Bhaker) हिने अत्यंत अटीतटीच्या लढतीत कांस्यपदक (Bronze Medal) पटकावले. चीनच्याच भूमीवर चिनी खेळाडूला पराभूत करून सुवर्ण जिंकण्याची ईशाची ही कामगिरी भारतीय क्रीडा क्षेत्रासाठी अभिमानास्पद ठरली आहे.
ईशाचा सुरुवातीपासून दबदबा; चीनची झांग चीत – (Esha Singh Gold)
Watch Esha Singh winning ISSF World Cup! pic.twitter.com/eoSdeLDjRu
— The Khel India (@TheKhelIndia) July 27, 2026
अंतिम फेरीत ईशा सिंगने सुरुवातीपासूनच अचूक वेध घेत सामन्यावर आपले वर्चस्व राखले. तिने ५० शॉट्समध्ये तब्बल ४० अंकांची कमाई करत सुवर्णपदक खिशात घातले. ईशाने यजमान चीनच्या युयुए झांग हिला तीन अंकांच्या फरकाने मागे टाकले. चिनी खेळाडू झांगला ३७ अंकांसह रौप्यपदकावर समाधान मानावे लागले.
डबल शूटऑफमध्ये मनू भाकरचा थरार! (Esha Singh Gold)
Bharat on the podium! 🥇🥉
Congratulations to Esha Singh and Manu Bhaker on winning Gold and Bronze in the Women’s 25m Pistol event at the ISSF World Cup in Hangzhou.
The entire nation is proud of you both! pic.twitter.com/51y7nEgAIJ
— Dr Mansukh Mandaviya (@mansukhmandviya) July 27, 2026
दुसरीकडे, ऑलिम्पिक पदकविजेत्या मनू भाकरने आपला फॉर्म कायम राखत कांस्यपदकासाठी झुंज दिली. उत्तर कोरियाच्या ह्योन ग्योंग पाकविरुद्ध तिचा सामना अत्यंत चुरशीचा झाला. गुण बरोबरीत सुटल्यामुळे झालेल्या थरारक ‘डबल शूटऑफ’मध्ये मनू भाकरने मानसिक संयम राखत बाजी मारली आणि कांस्यपदकावर मोहोर उमटवली.
भारताचे एकूण ३ पदक; पदक तालिकेत दुसरे स्थान! (Esha Singh Gold)
𝗗𝗢𝗨𝗕𝗟𝗘 𝗣𝗢𝗗𝗜𝗨𝗠 𝗙𝗢𝗥 𝗜𝗡𝗗𝗜𝗔 𝗔𝗧 𝗧𝗛𝗘 𝗜𝗦𝗦𝗙 𝗪𝗢𝗥𝗟𝗗 𝗖𝗨𝗣! 🤩🇮🇳
🥇 Esha Singh backs up her Munich triumph with a back-to-back World Cup gold medal, in the Women’s 25m Pistol. 😎
🥉 Manu Bhaker adds another international medal to her growing collection,… pic.twitter.com/lkCtEtNqle
— Royal Challengers Bengaluru (@RCBTweets) July 27, 2026
ईशाच्या सुवर्ण आणि मनूच्या कांस्यपदकामुळे या विश्वचषकात भारताच्या पदकांची एकूण संख्या ३ झाली आहे. यापूर्वी महिलांच्या १० मीटर एअर पिस्तूल प्रकारात संयमने रौप्यपदक जिंकून भारताचे खाते उघडले होते. सध्या पदक तालिकेत १४ पदकांसह (६ सुवर्ण) चीन पहिल्या स्थानावर आहे, तर भारत ३ पदकांसह गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर झेप घेण्यास यशस्वी ठरला आहे.





