‘शेती महामंडळाच्या कामगारांना वारसदारांना पाहिजे ते सहकार्य करू’ – माजी सभापती प्रवीण माने

इंदापूर : शेती महामंडळात अनेक वर्ष काबाड कष्ट करणाऱ्या कामगारांना,वारसदारांना त्यांच्या न्याय हक्कासाठी आंदोलन करावे लागते ही मोठी शोकांतिका आहे.या घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी पाहिजे ते सहकार्य आगामी काळात करणार असल्याची ग्वाही पुणे जिल्हा परिषदेचे बांधकाम माजी सभापती प्रवीण माने यांनी दिली.
महाराष्ट्र राज्य शेती महामंडळ रत्नपुरी मळा व इतर सर्व मळे येथील कामगार व त्यांचे वारसदार यांना राहते घर व दोन गुंठे जागा देऊन पंतप्रधान आवास व रमाई आवास योजनेद्वारे घरकूल मिळावे या मागणीकडे दुर्लक्ष करणाऱ्या सरकार विरोधात उपोषणास बसलेल्या शेती महामंडळ कामगारांच्या उपोषणास पाठिंबा देण्यासाठी इंदापूर तालुक्यातील वालचंदनगर रत्नपुरी येथे माजी बांधकाम आरोग्य सभापती प्रविणभैय्या माने उपस्थित होते.यावेळी माने बोलत होते.
यावेळी शेती महामंडळ कामगारांच्या मागण्या समजून घेतल्या व याविषयी सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासनही प्रवीणभैयांनी कामगार बांधवांना दिले. यावेळी प्रविण माने यांच्यासह राजेश जामदार, बाळासाहेब गायकवाड,नितीन गोरे आदी उपस्थित होते.





