Atul Kulkarni Post : ‘आमच्याकडून चुका झाल्या, माफी मागतो’; CJP आंदोलनाला अतुल कुलकर्णींचा जाहीर पाठिंबा
Atul Kulkarni Post : या पार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळासह मनोरंजन क्षेत्रातूनही विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. दरम्यान, अभिनेता अतुल कुलकर्णी यांनी या आंदोलनासंदर्भात सोशल मीडियावर केलेली पोस्ट विशेष चर्चेत आली आहे.

Atul Kulkarni Post : देशाच्या राजकारणात आणि सोशल मीडियावर गेल्या काही दिवसांपासून चर्चेचा विषय ठरलेल्या कॉकरोच जनता पार्टीच्या (CJP) आंदोलनाला अखेर अधिकृत परवानगी मिळाली आहे. आज सकाळी 10 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत दिल्लीतील जंतर-मंतर येथे पक्षाचे मोठे आंदोलन होणार असून, याकडे देशभराचे लक्ष लागले आहे.
कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दीपके हे अमेरिकेतून थेट राजधानी दिल्लीत दाखल झाले आहेत. ते दिल्ली विमानतळावर दाखल झाल्यानंतर त्यांच्या हातात डॅा. बाबासाहेब आंबेडकरांचं एक पुस्तक दिसलं. या आंदोलनात मोठ्या संख्येने तरुण सहभागी झाले आहेत. कोणताही अनुचित प्रकार घडू नये याची खबरदारी म्हणून चोख पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. (Atul Kulkarni Post)
या पार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळासह मनोरंजन क्षेत्रातूनही विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. दरम्यान, अभिनेता अतुल कुलकर्णी यांनी या आंदोलनासंदर्भात सोशल मीडियावर केलेली पोस्ट विशेष चर्चेत आली आहे. (Atul Kulkarni Post)
अतुल कुलकर्णींची सोशल मीडियावरील पोस्ट (Atul Kulkarni Post)
” माझ्या युवा नागरिकांनो, उद्याचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे. तुम्ही तुमचा आवाज बुलंद करण्यासाठी आणि तुमच्या हक्कांसाठी उभे राहण्याची तयारी करत आहात. माझ्या पिढीने, तसेच माझ्या आधी आणि माझ्या नंतरच्या पिढ्यांनीही आपल्या सगळ्या जबाबदाऱ्या नेहमीच योग्य प्रकारे पार पाडल्या, असे झालेले नाही. आमच्याकडून चुका झाल्या आहेत.अनेक बाबतीत आम्ही मोठी मोठी आव्हाने पुढे ढकलली आणि त्यांचा वारसा आता तुम्हाला मिळाला आहे. त्यासाठी मी तुमची माफी मागतो. स्वातंत्र्य, समता आणि बंधुता हा या देशाचा आत्मा आहे. मला पूर्ण विश्वास आहे की तुम्ही प्रामाणिकपणे आणि प्रत्येकाविषयी करुणा बाळगत या समाजाला आणि या देशाला नवे रूप द्याल. तुम्हा सर्वांना माझ्याकडून हार्दिक शुभेच्छा. अशी पोस्ट करत अतुल कुलकर्णी यांनी कॅाकरोच जनता पार्टीला समर्थन दिले आहे.
कॅाकरोच जनता पार्टीच्या वतीने देशातील विविध स्पर्धा परीक्षा आणि प्रवेश परीक्षांमधील कथित गैरव्यवहार, पेपरफुटी आणि घोटाळ्यांचा मुद्दा आक्रमकपणे उपस्थित केला जात आहे. याच पार्श्वभूमीवर केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली आहे. शिक्षण व्यवस्थेतील त्रुटी दूर करून विद्यार्थ्यांना न्याय मिळावा, या उद्देशाने आंदोलन पुकारल्याचा दावा पक्षाकडून करण्यात आला आहे. (Atul Kulkarni Post )
— atul kulkarni (@atul_kulkarni) June 5, 2026
या आंदोलनासाठी देशभरातून विद्यार्थी, स्पर्धा परीक्षा देणारे उमेदवार तसेच कोचिंग क्लास क्षेत्राशी संबंधित नागरिक मोठ्या संख्येने दिल्लीत दाखल होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सुरक्षा यंत्रणा पूर्णपणे सतर्क झाल्या आहेत. (Atul Kulkarni Post)
दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संभाव्य गर्दी आणि कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी नवी दिल्ली जिल्ह्याची 12 झोनमध्ये विभागणी करण्यात आली आहे. संसद मार्ग, जंतर-मंतर आणि इतर संवेदनशील भागांमध्ये 2,000 हून अधिक पोलीस व निमलष्करी दलाचे जवान तैनात करण्यात आले आहेत.
या आंदोलनामुळे राजधानीतील राजकीय वातावरण तापले असून, सरकार आणि विरोधकांच्या प्रतिक्रिया काय असतील याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
हेही वाचा : Breast Cancer: महिलांच्या ‘या’ निर्णयाचा स्तनाच्या कर्करोगाशी असू शकतो संबंध; संशोधनातून समोर आली माहिती





