Cockroach Janta Party Protest: “कॉकरोच आ रहे है, धर्मेंद्र प्रधान जा रहे है”; परवानगी मिळताच जंतर-मंतर मैदानावर अभिजित दिपकेच्या आंदोलनाला सुरुवात
Cockroach Janta Party Protest: समर्थकांची मोठी गर्दी

Cockroach Janta Party Protest: सोशल मीडियावर चर्चेत आलेल्या ‘कॉकरोच जनता पार्टी’ (CJP) चा संस्थापक अभिजित दिपके शनिवारी सकाळी ७:४५ वाजता अमेरिकेतून थेट दिल्लीत दाखल झाला आहेत. तो दिल्लीतील जंतर-मंतर मैदानावर या आंदोलनाचे नेतृत्व करणार आहे. दिल्लीत उतरताच अभिजित दिपके जंतर-मंतरवर आंदोलनाची अधिकृत परवानगी घेण्यासाठी पार्लियामेंट स्ट्रीट पोलीस स्टेशनकडे रवाना झाला. (Cockroach Janta Party Protest)
अखेर दिल्ली पोलिसांकडून जंतर-मंतरवर आंदोलन करण्याची परवानगी मिळाली आहे. अभिजितने या मोहिमेचे वर्णन ‘एक शांततापूर्ण घटनात्मक आंदोलन’ असे केले. CJP ने एका निवेदनात म्हटले आहे की, ‘‘पोलीस अधिकाऱ्यांनी विमानतळावर त्यांची भेट घेतली. त्यामुळे कॉकरोच जनता पार्टी आता आंदोलकांना संसद मार्ग पोलीस ठाण्याऐवजी थेट जंतर-मंतरवर पोहोचण्याचे आवाहन करत आहे.’’ (Cockroach Janta Party Protest)
भारतात पोहोचल्यानंतर अभिजित दीपके ( Abhijit Dipake) यांनी आपली मागणी पुन्हा लावून धरत शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची आणि विद्यार्थ्यांशी संबंधित मुद्द्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनाला सकाळी १० वाजता सुरुवात होईल, अशी माहिती ‘कॉकरोच जनता पार्टी’च्या (CJP) अधिकृत ‘X’ (ट्विटर) खात्यावरून एका पोस्टद्वारे देण्यात आली आहे.
With the full backing of the Constitution of India, cockroaches will begin our protest at Jantar Mantar demanding Dharmendra Pradhan’s resignation starting at 10 am.@abhijeet_dipke is on his way to Jantar Mantar. pic.twitter.com/bydPva07dl
— Cockroach is Back (@Cockroachisback) June 6, 2026
या संघटनेचे संस्थापक अभिजीत दीपके हे डॉ. बी. आर. आंबेडकर यांचे ‘माय ऑटोबायोग्राफी’ (माझे आत्मचरित्र) हे पुस्तक हातात धरलेले दिसत असून, त्यांच्यासोबत संघटनेचे प्रवक्ते आणि मुख्य सदस्य आशुतोष रांका देखील उपस्थित आहेत. ( Cockroach Janta Party Protest)
संघटनेने आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, “भारताच्या संविधानाचा पूर्ण पाठिंबा घेऊन, कॉकरोच जनता पार्टी धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यासाठी सकाळी १० वाजल्यापासून जंतरमंतर येथे आपले आंदोलन सुरू करेल. (Cockroach Janta Party Protest)





