Mamata Banerjee : ममता बॅनर्जींसमोर मोठं संकट; MLA नंतर आता MP देखील फुटीच्या मार्गावर; बड्या नेत्याने स्पष्टचं सांगितलं
Mamata Banerjee : त्यामुळे आता या राजकीय भूकंपाचे पडसाद संसदेत उमटणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Mamata Banerjee : पश्चिम बंगालच्या राजकारणात तृणमूल काँग्रेस (टीएमसी) पक्षाला सध्याच्या काळात मोठ्या अंतर्गत संकटाचा सामना करावा लागत आहे. पक्षातील आमदारांच्या फुटीनंतर आता हा असंतोष लोकसभा आणि राज्यसभेपर्यंत पोहोचण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे मुख्यमंत्री आणि पक्षप्रमुख ममता बॅनर्जी यांच्यासमोर मोठं संकट उभं ठाकलं आहे. त्या परिस्थितीवर लक्ष्य ठेवून असून हालचाली तीव्र झाल्या आहेत.
त्यांच्याच पक्षातील नेते ऋतब्रता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखाली सुमारे 60 आमदारांनी वेगळी भूमिका घेतल्याने टीएमसीसमोर अभूतपूर्व आव्हान उभे राहिले आहे. या घडामोडी इतक्या गंभीर ठरल्या की विधानसभा अध्यक्षांनी ऋतब्रता बॅनर्जी यांना विरोधी पक्षनेते म्हणून मान्यता दिली. त्यामुळे आता या राजकीय भूकंपाचे पडसाद संसदेत उमटणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Mamata Banerjee : ममता बॅनर्जींसमोर मोठं संकट; MLA नंतर आता MP देखील फुटीच्या मार्गावर; बड्या नेत्याने स्पष्टचं सांगितलं
बड्या नेत्याने स्पष्टचं सांगितलं (Mamata Banerjee )
वृत्तसंस्था पीटीआयच्या माहितीनुसार, राज्यसभा खासदार सुखेंदू शेखर रॉय यांनीही या शक्यतेबाबत चिंता व्यक्त केली आहे. अल्पावधीत मोठ्या प्रमाणावर आमदारांनी पक्षाची साथ सोडल्यामुळे त्याचे परिणाम लोकसभा आणि राज्यसभेतही दिसू शकतात, असे त्यांनी म्हटले आहे. त्यांनी राज्यसभा निवडणुकांबाबत थेट भाष्य टाळले असले तरी, अशा घडामोडींची शक्यता नाकारता येत नसल्याचे स्पष्ट केले.
मात्र, टीएमसीचे वरिष्ठ खासदार सौगत रॉय यांनी पक्षात मोठी फूट पडल्याचे दावे फेटाळून लावले आहेत. भाजप बंगाल विधानसभेत वापरलेली रणनीती आता संसदेतही राबवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप त्यांनी केला. ममता बॅनर्जी यापूर्वीही अनेक राजकीय संकटांमधून यशस्वीपणे बाहेर पडल्या असून, यावेळीही त्या परिस्थितीवर मात करतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
हेही वाचा : Beed News : बायकोची ‘ती’ डायरी वाचली अन् तलाठी पतीने मृत्यूला कवटाळलं; बीड हळहळलं, नेमकं काय घडलं?
दरम्यान, बारासातच्या खासदार काकोली घोष दस्तीदार यांच्या नावाची राजकीय वर्तुळात विशेष चर्चा सुरू आहे. लोकसभेतील मुख्य प्रतोद पदावरून हटवल्यानंतर त्यांनी पक्ष नेतृत्वाबाबत नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळे संभाव्य बंडखोरांमध्ये त्यांच्या नावाची चर्चा होत असली तरी त्यांनी अद्याप कोणतीही अधिकृत भूमिका जाहीर केलेली नाही.
दोन खासदारांवर सोपवली मोठी जबाबदारी (Mamata Banerjee )
सूत्रांच्या माहितीनुसार, परिस्थिती हाताबाहेर जाण्यापूर्वी ती नियंत्रणात आणण्यासाठी ममता बॅनर्जी यांनी गेल्या दोन दिवसांत नाराज आमदार आणि खासदारांशी वैयक्तिक संवाद साधला आहे. तसेच संसदेत पक्षातील दोन विश्वासू खासदारांवर मित्रपक्षांशी समन्वय साधण्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
सध्या लोकसभेत टीएमसीचे 28 तर राज्यसभेत 13 खासदार आहेत. पक्षांतरबंदी कायद्यानुसार, दोन-तृतीयांश सदस्यांनी वेगळा गट स्थापन केल्यास त्यांचे सदस्यत्व टिकू शकते. त्यामुळे “ऋतब्रता मॉडेल” अंतर्गत स्वतंत्र गट स्थापन करण्याची किंवा दुसऱ्या पक्षात विलीन होण्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
तथापि, पक्षाचे निवडणूक चिन्ह आणि संघटनेवरील नियंत्रण केवळ आमदार किंवा खासदारांच्या संख्येवर अवलंबून नसून, संघटनात्मक बहुमत कोणाकडे आहे हे निवडणूक आयोगासमोर सिद्ध करावे लागणार आहे. त्यामुळे बंगालमधील ही लढाई आता केवळ विधानसभेपुरती मर्यादित राहिलेली नसून ती राष्ट्रीय राजकारणातही चर्चेचा विषय बनली आहे.





