Hardik Pandya : मिस्टर बीस्टला हरवून हार्दिकने जिंकले ९५ लाख; पण घेतलेल्या निर्णयाची होतेय सर्वाधिक चर्चा, पाहा व्हिडिओ
Hardik Pandya : मिस्टर बीस्टने भारत दौऱ्यादरम्यान हार्दिक पांड्यासोबत एक भन्नाट बेसबॉल चॅलेंज आयोजित केले होते.

Hardik Pandya : प्रसिद्ध यूट्यूबर मिस्टर बीस्टने नुकताच भारत दौरा केला. या दौऱ्यातील एका खास चॅलेंजची सध्या जोरदार चर्चा रंगली आहे. मिस्टर बीस्ट आणि भारतीय क्रिकेटपटू हार्दिक पांड्या यांच्यात बेसबॉलचा सामना रंगला. विशेष म्हणजे, या अनोख्या चॅलेंजमध्ये हार्दिकने मिस्टर बीस्टला पराभूत करत तब्बल १ लाख अमेरिकन डॉलर्स म्हणजेच अंदाजे ९५ लाख रुपयांचे बक्षीस जिंकले. पण या रकमेबाबत हार्दिकने घेतलेल्या निर्णयाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.
बेसबॉलच्या मैदानात हार्दिकचा जलवा
मिस्टर बीस्टने भारत दौऱ्यादरम्यान हार्दिक पांड्यासोबत एक भन्नाट बेसबॉल चॅलेंज आयोजित केले होते. या स्पर्धेत दोघांसमोर बेसबॉल बॅटने चेंडू मारून तो तीन वेळा स्टेडियमच्या बाहेर पाठवण्याचे आव्हान होते. या चॅलेंजमध्ये हार्दिक आणि मिस्टर बीस्ट यांच्यात चांगलीच रंगत पाहायला मिळाली.
विशेष म्हणजे, मिस्टर बीस्टने आपण लहानपणी बेसबॉल खेळत असल्याचे सांगितले. त्यामुळे या खेळाचा आपल्याला काहीसा अनुभव असल्याचेही त्याने स्पष्ट केले. याउलट, हार्दिकने यापूर्वी कधीही बेसबॉल खेळला नसल्याचे सांगितले. तरीही त्याने पहिल्याच प्रयत्नात मारलेला फटका पाहून उपस्थितांना आश्चर्याचा धक्का बसला.
Hardik Pandya × Mr Beast🔥
Hardik won the challenge and the amount $100,000
Hardik chose to donate the money to underprivileged children and provide care for stray dogs❤️
What a lovely gesture by him🥹
@hardikpandya7 https://t.co/pQVglpeBug
— Rohan Gangta (@rohangangta) October 31, 2026
जिंकलेले ९५ लाख रुपये दान करण्याचा निर्णय
या चॅलेंजमध्ये विजयाबद्दल हार्दिकला १ लाख अमेरिकन डॉलर्स म्हणजेच भारतीय चलनानुसार अंदाजे ९५ लाख रुपयांचे बक्षीस मिळाले. मात्र, बक्षिसाची रक्कम मिळाल्यानंतर ती दान करण्याचा निर्णय त्याने घेतला. त्याच्या या निर्णयाचे चाहत्यांकडून कौतुक केले जात आहे.





