KKR vs PBKS : ‘३०० धावा करणे मोठी गोष्ट नाही…’, पंजाबविरुद्धच्या सामन्यापूर्वी रिंकू सिंगचं मोठं वक्तव्य

Rinku Singh bold statement about 300 score ahead KKR vs PBKS : आयपीएल २०२५ मध्ये कोलकाता नाईट रायडर्स (KKR) आणि पंजाब किंग्ज (PBKS) यांच्यातील सामना शनिवार २६ एप्रिल रोजी खेळला जाईल. हा सामना कोलकाताच्या ईडन गार्डन्स येथे संध्याकाळी ७.३० वाजता खेळला जाणार आहे. या सामन्यापूर्वी केकेआरचा स्टार खेळाडू रिंकू सिगने एक मोठं वक्तव्य केलं आहे, ज्याची सध्या सर्वत्र चर्चा आहे.
सध्या, पंजाब किंग्ज पॉइंट्स टेबलमध्ये पाचव्या स्थानावर आहे. त्याच वेळी, कोलकाता नाईट रायडर्स पॉइंट्स टेबलमध्ये सातव्या स्थानावर आहे. पंजाब किंग्ज विरुद्धच्या सामन्यापूर्वी, केकेआरमध्ये फिनिशरची भूमिका बजावणारा फलंदाज रिंकू सिंग याने एक मोठं विधान केलं आहे. त्याने म्हटलं आहे की त्याच्या संघात ३०० धावा करण्याची क्षमता आहे. रिंकूचा असा विश्वास आहे की आयपीएल आता इतकी परिपक्व झाली आहे की येथे ३०० धावा करणे शक्य आहे.
आम्ही ३०० धावा करू शकतो- रिंकू सिंग
#RinkuSingh opens up on how he’s shaped his role in the lower order learning from two of the best in the business.#IPLonJioStar 👉 #KKRvPBKS | 26th APR, SAT, 6:30 PM | LIVE on Star Sports 1, Star Sports 1 Hindi & JioHotstar pic.twitter.com/uIDx9taB7n
— Star Sports (@StarSportsIndia) April 26, 2025
जिओ हॉटस्टारच्या ‘झेन बोल्ड’ वर बोलताना रिंकू सिंगला ३०० धावा करण्याबद्दल विचारले. यावर रिंकू म्हणाला, “हो, आम्ही ३०० धावा करू शकतो. आयपीएल अशा टप्प्यावर पोहोचली आहे, जिथे ३०० धावा करणे अशक्य नाही. गेल्या वर्षी पंजाबने २६२ धावांचा पाठलाग केला होता. या हंगामात सर्व संघ मजबूत आहेत आणि कोणीही ३०० धावांचा टप्पा गाठू शकतो.”
हेही वाचा – MI vs LSG : ‘क्या रे हीरो, अभी आ रहा है, घर का टीम है क्या?’, रोहितने घेतली शार्दुलची शाळा, पाहा VIDEO
तुम्ही शांत राहता तेव्हा गोष्टी व्यवस्थित होतात – रिंकू सिंग
शिवाय, रिंकू सिंगला त्याच्या फलंदाजीबद्दलही विचारण्यात आले. याबद्दल बोलताना तो म्हणाला की, “मी सहसा ५ व्या किंवा ६ व्या क्रमांकावर फलंदाजी करतो. मी हे उत्तर प्रदेश आणि आयपीएलमध्ये करत आलो आहे. त्यामुळे मला त्याची सवय झाली आहे. मी फिटनेसकडे खूप लक्ष देतो, कारण आयपीएलमधील १४ सामने असल्याने, माझा फिटनेस सांभाळणे ही माझी जबाबदारी आहे. मी माही भाईंशीही अनेकदा बोलतो. ते मला शांत राहून सामन्याच्या परिस्थितीनुसार खेळायला सांगतात. जेव्हा तुम्ही शांत राहता तेव्हा गोष्टी व्यवस्थित होतात.”





