KKR vs RR : अखेर कोलकात्याला सापडला विजयाचा मंत्र! सलग ५ पराभवांनंतर राजस्थानला लोळवलं; रिंकू सिंग ठरला गेमचेंजर
KKR vs RR : ईडन गार्डन्सवर पार पडलेल्या या थरारक लढतीत कोलकात्याने राजस्थान रॉयल्सचा ४ गडी राखून पराभव केला.

KKR vs RR Kolkata Knight Riders register 1st win IPL 2026 : आयपीएल २०२६ च्या २८ व्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सने (KKR) अखेर विजयाचे खाते उघडले आहे. ईडन गार्डन्सवर पार पडलेल्या या थरारक लढतीत कोलकात्याने राजस्थान रॉयल्सचा ४ गडी राखून पराभव केला. सलग पराभवांच्या मालिकेनंतर मिळालेल्या या पहिल्या विजयामुळे केकेआरच्या गोटात आनंदाचे वातावरण आहे.
वरुण-कार्तिकने राजस्थानच्या मोडले कंबरडे –
घरच्या मैदानावर नाणेफेक हारल्यानंतर प्रथम गोलंदाजी करताना कोलकात्याच्या गोलंदाजांनी राजस्थानला १५५ धावांत रोखले. राजस्थानची सुरुवात तशी धडाकेबाज झाली होती. यशस्वी जैस्वाल आणि युवा फलंदाज वैभव सूर्यवंशी यांनी ८.४ षटकांत ८१ धावांची सलामी दिली. सूर्यवंशीने २८ चेंडूंत ४६ धावांची खेळी केली, तर जैस्वाल ३९ धावांवर बाद झाला. मात्र, त्यानंतर राजस्थानची मधली फळी पत्त्यासारखी कोसळली. वरुण चक्रवर्ती आणि कार्तिक त्यागी यांनी प्रत्येकी ३ विकेट्स घेत राजस्थानच्या फलंदाजीचे कंबरडे मोडले.
Standing tall when the team needs him most 💪
Rinku Singh keeps the Knights alive as we head straight down the wire! 💜#KKR need 28 runs from 18 balls
Updates ▶️ https://t.co/776nTdPbPj#TATAIPL | #KhelBindaas | #KKRvRR pic.twitter.com/VMVdwVR13Z
— IndianPremierLeague (@IPL) April 19, 2026
कोलकात्याची डळमळीत सुरुवात –
प्रत्युत्तरात १५६ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना कोलकाता नाईट रायडर्सची अवस्था बिकट झाली होती. सलामीवीर टिम सीफर्ट आणि कर्णधार अजिंक्य रहाणे हे दोघेही शून्यावर बाद झाले. अवघ्या ५२ धावांत संघाने ४ महत्त्वाचे गडी गमावले होते. कॅमेरून ग्रीन (२७) आणि रोव्हमन पॉवेल (२३) यांनी डावाला आकार देण्याचा प्रयत्न केला, पण ८५ धावांवर ६ विकेट्स गेल्याने कोलकाता पराभवाच्या छायेत होता.
रिंकू आणि अनुकूलची मॅच विनिंग भागीदारी –
TIGHT. ECONOMICAL. GAME-CHANGING. 🎯
Varun Chakaravarthy delivered exactly what the Knights needed to get back in the game! ✨
Watch his spell ▶️ https://t.co/yBsTdN4AeC#TATAIPL | #KhelBindaas | #KKRvRR | @KKRiders pic.twitter.com/OzNDsYteFH
— IndianPremierLeague (@IPL) April 19, 2026
कठीण प्रसंगी ‘फिनिशर’ रिंकू सिंग आणि अनुकूल रॉय हे धावून आले. या जोडीने सातव्या विकेटसाठी अवघ्या ३७ चेंडूंत ७६ धावांची अभेद्य भागीदारी करत कोलकात्याला विजय मिळवून दिला. रिंकू सिंगने आपल्या आक्रमक फलंदाजीने राजस्थानच्या गोलंदाजांना निरुत्तर केले. राजस्थानकडून रवींद्र जडेजाने २ विकेट्स घेतल्या, तर जोफ्रा आर्चर आणि रवी बिश्नोईला प्रत्येकी १ विकेट्स घेतली. सलग ५ सामने गमावल्यानंतर कोलकात्याचा हा या मोसमातील पहिलाच विजय ठरला, तर राजस्थानचा सलग दुसरा पराभव ठरला.





