Super Over Rules : आश्चर्यकारक! सुपर ओव्हरमधील धावा-विकेट्स खेळाडूच्या खात्यात का जमा होत नाहीत? जाणून घ्या कारण?
Super Over Rules : सुनील नरेनची भेदक गोलंदाजी आणि रिंकू सिंगचा विजयी चौकार यामुळे केकेआरने विजय तर मिळवला, पण तांत्रिकदृष्ट्या या कामगिरीची नोंद खेळाडूंच्या वैयक्तिक रेकॉर्डमध्ये झाली नाही.

Super Over Rules IPL 2026 :आयपीएल २०२६ मधील लखनौ सुपर जायंट्स आणि कोलकाता नाइट रायडर्स (KKR) यांच्यातील ३८ वा सामना सुपर ओव्हरच्या थरारामुळे इतिहासात नोंदवला गेला आहे. सुनील नरेनची भेदक गोलंदाजी आणि रिंकू सिंगचा विजयी चौकार यामुळे केकेआरने विजय तर मिळवला, पण तांत्रिकदृष्ट्या या कामगिरीची नोंद खेळाडूंच्या वैयक्तिक रेकॉर्डमध्ये झाली नाही. असं का झालं? जाणून घेऊया.
लखनौविरुद्धच्या सामन्यात सुपर ओव्हरमध्ये सुनील नरेनने अवघ्या ३ चेंडूत २ विकेट्स घेत लखनौचा डाव गुंडाळला, तर रिंकू सिंगने पहिल्याच चेंडूवर चौकार मारून संघाला विजय मिळवून दिला. केकेआरच्या चाहत्यांसाठी हा आनंदाचा क्षण असला तरी, क्रिकेटच्या नियमांनुसार नरेनच्या खात्यात या दोन विकेट्स आणि रिंकूच्या खात्यात ४ धावांची भर पडलेली नाही. हा नेमका काय प्रकार आहे, असा प्रश्न आता अनेक क्रिकेटप्रेमींना पडला आहे.
#KKR win the first SUPER OVER of the season 🤩@kkriders with a hard earned win after 42 overs of topsy turvy cricket 👏
Scorecard ▶️ https://t.co/elFxwvCeWO#TATAIPL | #KhelBindaas | #LSGvKKR pic.twitter.com/yIoX0vQOMv
— IndianPremierLeague (@IPL) April 26, 2026
सुपर ओव्हर: फक्त निकालासाठीचा ‘टाय-ब्रेकर’
क्रिकेटमधील नियमांनुसार, सुपर ओव्हरचा वापर हा फुटबॉलमधील ‘पेनल्टी शूटआऊट’ सारखा केला जातो. जेव्हा निर्धारित २० षटकांचा खेळ बरोबरीत सुटतो, तेव्हा केवळ विजेता ठरवण्यासाठी सुपर ओव्हर खेळवली जाते. आयसीसीच्या (ICC) नियमावलीनुसार, सुपर ओव्हरमध्ये केलेल्या कामगिरीचा (धावा किंवा विकेट्स) समावेश खेळाडूच्या कारकिर्दीतील अधिकृत आकडेवारीमध्ये केला जात नाही.
भेदभाव टाळण्यासाठी नियमात तरतूद –
Rinku Singh with more brilliance tonight 🫴🫡
📸 👉 A fantastic catch at the boundary to send back Aiden Markram 👏
Updates ▶️ https://t.co/elFxwvCeWO#TATAIPL | #KhelBindaas | #LSGvKKR pic.twitter.com/OP5lihi9nu
— IndianPremierLeague (@IPL) April 26, 2026
टी-२० क्रिकेटमध्ये एका गोलंदाजाला जास्तीत जास्त ४ षटके टाकण्याची मर्यादा असते. सुपर ओव्हरमधील षटक हे गोलंदाजाचे ‘अतिरिक्त’ षटक ठरते. तसेच फलंदाजालाही दुसऱ्यांदा फलंदाजीची संधी मिळते. जर या धावा आणि विकेट्स अधिकृत आकडेवारीत मोजल्या, तर ज्या खेळाडूंना सुपर ओव्हर खेळायला मिळाली नाही, त्यांच्यावर तो अन्याय ठरेल. ही असमानता टाळण्यासाठी आणि क्रिकेटमध्ये समानता राखण्यासाठी सुपर ओव्हरमधील आकडेवारी खेळाडूच्या मुख्य प्रोफाईलमध्ये जोडली जात नाही. त्यामुळेच नरेन आणि रिंकूने सामना जिंकून दिला असला, तरी त्यांच्या ‘स्टॅट्स’मध्ये कोणताही बदल झालेला नाही.





