Rinku Narine Video : ‘अरे भैया नहीं ब्रदर…’, रिंकूने व्हिडीओ कॉलद्वारे सुनील नरेनची आई आणि बहिणीशी करून दिली ओळख, पाहा VIDEO
Rinku Narine Video : २६ एप्रिलच्या सामन्यात कठीण प्रसंगात त्याने नाबाद ८३ धावांची खेळी केली आणि क्षेत्ररक्षणादरम्यान पाच अफलातून झेल टिपले.

Rinku Singh Sunil Narine Viral Video : कोलकाता नाइट रायडर्सचा (KKR) स्टार फलंदाज रिंकू सिंग आणि ‘मिस्ट्री स्पिनर’ सुनील नरेन यांच्यातील मैत्री सर्वश्रुत आहे. मात्र, नुकताच सोशल मीडियावर व्हायरल झालेला एक व्हिडीओ या दोघांमधील नात्याची एक वेगळीच आणि गोड बाजू समोर आणत आहे. रिंकूने आपल्या कुटुंबाची ओळख नरेनशी करून दिली असून, या संवादाने नेटकऱ्यांची मने जिंकली आहेत.
लखनौविरुद्धच्या थरारक विजयानंतर कोलकाता नाइट रायडर्सचे खेळाडू हॉटेलमध्ये विश्रांती घेत होते. याच दरम्यान रिंकू सिंगला त्याच्या घरून आई आणि बहिणीचा व्हिडीओ कॉल आला. रिंकूने केवळ गप्पा मारल्या नाहीत, तर आपला सहकारी खेळाडू सुनील नरेनची ओळखही आपल्या कुटुंबाशी करून दिली.
Rinku Singh’s family talking to Sunil Narine. 🥹❤️ pic.twitter.com/rjR1VoQfqS
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) April 27, 2026
‘भैया’ की ‘ब्रदर’? रिंकूची झाली तारांबळ-
Name is sunil so they thought he is Indian 😂
— Shubham (@shubhamG_02) April 27, 2026
या व्हिडीओ कॉलमध्ये रिंकूने मोबाईलचा कॅमेरा सुनील नरेनकडे वळवताच त्याच्या बहिणीने उत्साहात नरेनला ‘भैया’ म्हणून हाक मारली. हे ऐकून रिंकूने तात्काळ तिला थांबवले आणि मजेशीर भाषेत समजावले की, “त्यांना हिंदी कळत नाही, त्यांना भैया नाही तर ‘ब्रदर’ म्हणं.” बहिणीने लगेच सुधारणा केली, पण काही क्षणातच ती पुन्हा विसरली आणि म्हणाली, “भैया, तुम्ही खूप छान बॉलिंग केली!” हे ऐकून रिंकू आणि नरेन दोघेही मनमोकळेपणाने हसू लागले. रिंकूने नरेनला इंग्रजीत ट्रान्सलेट करून सांगितले की, “बहीण म्हणतेय तुम्ही खूप चांगली गोलंदाजी केली.” त्यावर कॅरेबियन स्टारने हसून ‘थँक्यू’ म्हटले.
आईनेही मानले नरेनचे आभार –
Bhai sunil Narine ko haste dekh liya….
Aur kya chahye zindagi me😂😂— Henil Shah (@Promise_Invest) April 27, 2026
रिंकूने आपल्या आईलाही नरेनची ओळख करून दिली. नरेननेही अतिशय नम्रपणे हात उंचावून रिंकूच्या आईचे अभिवादन केले. चाहत्यांनी या व्हिडीओवर मजेशीर कमेंट्स केल्या आहेत. एका युजरने लिहिले, “त्याचं नाव सुनील आहे, म्हणून रिंकूच्या घरच्यांना तो भारतीयच वाटला असावा!” तर दुसऱ्याने लिहिले की, “सुनील नरेनला इतकं हसताना पाहून दिवस सार्थकी लागला.”





