Rinku Singh Video : रिंकू लवकरच चढणार बोहल्यावर? प्रिया सरोजसोबत गंगा आरतीला हजेरी लावल्याने लग्नाच्या चर्चांना उधाण
Rinku Singh Video : दोघांनीही श्री काशी विश्वनाथ मंदिरात जाऊन विधिवत पूजा-अर्चा केली. सुमारे अर्धा तास मंदिर परिसरात थांबून त्यांनी महादेवाचा आशीर्वाद घेतला.

Rinku Singh Priya Saroj Varanasi Visit Video Viral : भारतीय क्रिकेटचा नवा ‘फिनिशर’ रिंकू सिंग आणि खासदार प्रिया सरोज यांची वाराणसी येथील आध्यात्मिक सफर सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरली आहे. आयपीएल २०२६ च्या धावपळीतून वेळ काढून या जोडीने काशी विश्वनाथ चरणी माथा टेकवला असून, त्यांच्या लग्नाच्या चर्चांनाही आता उधाण आले आहे.
आयपीएल २०२६ मध्ये आपल्या बॅटने धमाका करणारा रिंकू सिंग सध्या वेगळ्याच कारणाने चर्चेत आहे. रिंकू आणि खासदार प्रिया सरोज नुकतेच वाराणसीमध्ये एकत्र दिसले. विमानतळावर उतरल्यानंतर रिंकूचे प्रिया सरोज यांच्या निवासस्थानी कौटुंबिक स्वागत करण्यात आले. यानंतर या जोडीने वाराणसीच्या धार्मिक आणि सांस्कृतिक वारशाचा अनुभव घेण्यासाठी शहराचा फेरफटका मारला.
काशी विश्वनाथ मंदिर आणि गंगा आरती –
भारतीय क्रिकेटर रिंकू सिंह जी पहुंचे ससुराल विधायक तूफ़ानी सरोज जी ने स्वागत किया?? pic.twitter.com/jKR8AraYFi
— Shyam Yadav SP (@shyamyadavsp95) April 22, 2026
दोघांनीही श्री काशी विश्वनाथ मंदिरात जाऊन विधिवत पूजा-अर्चा केली. सुमारे अर्धा तास मंदिर परिसरात थांबून त्यांनी महादेवाचा आशीर्वाद घेतला. यावेळी रिंकूने आपल्या आगामी सामन्यांमधील यशासाठी प्रार्थना केली. दर्शन झाल्यानंतर रिंकू आणि प्रिया यांनी नौकाविहाराचा आनंद लुटला. सायंकाळी दशाश्वमेध घाटावर होणाऱ्या विश्वप्रसिद्ध गंगा आरतीमध्ये दोघेही सहभागी झाले. अतिशय साधेपणाने आणि श्रद्धेने त्यांनी गंगा मातेची आराधना केली, ज्याचे व्हिडिओ सध्या इंटरनेटवर तुफान व्हायरल होत आहेत.
लग्नाच्या चर्चांना उधाण –
सांसंद प्रिया सरोज और क्रिकेटर रिंकू सिंह वाराणसी पहुंचें
वहां बाबा विश्वनाथ जी के दर्शन किएप्रिया सरोज जी की सादगी उनके चेहरे पर और पहनावे में झलकती है
डिंपल भाभी जी के साथ रहने का असर है
रिंकू सिंह और प्रिया सरोज जून 2026 मे शादी के बंधन में बधने वाले हैं pic.twitter.com/38eNpJPZO1
— neeraj yadav (@apna123neeraj) April 22, 2026
वाराणसीच्या या भेटीनंतर रिंकू आणि प्रिया सरोज यांच्या लग्नाबाबतच्या चर्चांना वेग आला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, हे जोडपे जून २०२६ मध्ये वाराणसीमध्येच विवाहबंधनात अडकण्याची शक्यता आहे. अद्याप यावर कोणतीही अधिकृत मोहोर उमटवण्यात आलेली नाही, तरीही चाहत्यांकडून या ‘पॉवर कपल’वर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. मैदानावर षटकारांची आतिषबाजी करणाऱ्या रिंकूच्या आयुष्यात आता नवीन इनिंग सुरू होणार असल्याचे संकेत मिळत आहेत.





