वाघोली, (प्रतिनिधी): वाघोली येथील वाघेश्वर नगर गोरेवस्ती रोड येथे अनेक वर्षांपासून खुलेआम गांजा विक्री होत असून गांजा खरेदी करण्यासाठी आलेल्या ग्राहकांकडून परिसरातील नागरिकांना त्रास सहन करावा लागत असल्याने गांजा विक्रेते व गांजा विकत घेणाऱ्या ग्राहकांवर कारवाई करावी, अशी मागणी शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे सागर गोरे यांनी पोलिसांकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात म्हंटले आहे कि, वाघेश्वर नगर गोरेवस्ती रोड येथे अनेक वर्षांपासून प्रशासकिय व्यवस्थेला न जुमनता खुलेआम गांजा विक्री होत आहे. हा गांजा खरेदी करण्यासाठी येत असलेल्या आयटी क्षेत्रातील तसेच गुंड प्रवृत्तीच्या ग्राहकांकडून परिसरातील नागरिकांना तसेच महिलांना, मुलांना नाहक त्रास सहन करावा लगत आहे.
प्रामुख्याने कचरा डेपो समोरील बाजूस उभे राहून गांजा विक्रेत्या तसेच ग्राहकांपासून महिलांना छेडछाडीचे प्रकार बऱ्याचदा घडले आहेत. वेळोवेळी तोंडी तसेच लेखी माहिती दिली आहे. परिसरात खुलेआम गांजा विक्री होत असल्याने मुलांवर याचे दूष्परिणाम होण्याची शक्यता आहे.
गांजा विक्रेते यांच्या लवकर मुसक्या आवळणे गरजेचे आहे. पोलिसांनी योग्य ती कार्यवाही करून गांजा विक्रेते तसेच गांजा खरेदी करणाऱ्या ग्राहकांवर गुन्हे दाखल करून गांजा विक्रेते यांचे धदे बंद करावेत. हे धंदे बंद होण्याबाबत तोंडी तसेच लेखी विनंती केलेली आहेत. धंदे बंद न झाल्यास पोलिसांच्या कार्यालयासमोर परिसरातील नागरिकांचे सहकुटुंब उपोषण केल्या जाईल, असा इशारा सागर गोरे यांनी दिला आहे.