Vishwas Nangre Patil : नागपूर पोलीस आयुक्तपदी विश्वास नांगरे-पाटील रुजू; गुन्हेगारांचा कणा मोडण्यासाठी ‘ऑपरेशन थंडर’ होणार तीव्र
Vishwas Nangre Patil : महाराष्ट्रातील अत्यंत डॅशिंग आणि धडाडीचे ज्येष्ठ आयपीएस (IPS) अधिकारी विश्वास नांगरे-पाटील यांनी आज अधिकृतपणे उपराजधानीच्या नागपूर पोलीस आयुक्तपदाची सूत्रे हाती घेतली आहेत.

Vishwas Nangre Patil : ज्येष्ठ आयपीएस अधिकारी विश्वास नांगरे-पाटील यांनी आज अधिकृतपणे नागपूर पोलीस आयुक्तपदाची सूत्रे हाती घेतली. पदभार स्वीकारल्यानंतर आयोजित पहिल्या पत्रकार परिषदेत त्यांनी नागपूर पोलिसांची पुढील कार्यपद्धती आणि आपली भूमिका स्पष्ट केली. (Vishwas Nangre Patil)
शहराची सुरक्षा आणि कायदा-सुव्यवस्था राखणे हे आपले सर्वोच्च प्राधान्य असेल, असे त्यांनी ठामपणे सांगितले. नांगरे-पाटील म्हणाले, आमच्या खांद्यावर शोभणारे आयपीएस हे चिन्ह केवळ जनतेच्या सेवेसाठी आहे. (Vishwas Nangre Patil)
त्यामुळे सामान्यांनी पोलिसांना घाबरण्याचे कारण नाही, उलट जनतेला पोलीस आपले वाटले पाहिजेत. मात्र, शहरात कायदा हातात घेणा-या गुन्हेगारांनी पोलिसांचा धाक बाळगलाच पाहिजे, असे त्यांनी ठामपणे नमूद केले. (Vishwas Nangre Patil)
नागपूर शहराला ड्रग्जमुक्त करण्यासाठी ऑपरेशन थंडर ही मोहीम अधिक तीव्र केली जाईल, असेही त्यांनी सांगितले. विद्यार्थी आणि तरुण पिढीला अमली पदार्थांपासून वाचवणे हे आमचे प्राथमिक कर्तव्य आहे. पुराव्यावर आधारित पोलिसिंग करून गुन्हेगारीचा कणा मोडला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. (Vishwas Nangre Patil)





