Petrol Diesel Rules : पेट्रोल-डिझेल खरेदीच्या नियमात मोठा बदल, केंद्र सरकारचा निर्णय
Petrol Diesel Rules : देशभरातील लाखो वाहनधारक, ट्रक चालक आणि विशेषतः ट्रान्सपोर्ट व लॉजिस्टिक्स व्यवसायाशी संबंधित असलेल्यांसाठी केंद्र सरकारने एक अत्यंत मोठा आणि दिलासादायक निर्णय घेतला आहे.

Petrol Diesel Rules : देशभरातील वाहनधारक आणि विशेषतः ट्रान्सपोर्ट व्यवसायाशी संबंधितांसाठी मोठा दिलासा देणारा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. 1 जुलै 2026 पासून रिटेल पेट्रोल पंपांवर पेट्रोल आणि डिझेल खरेदीवरील 200 लिटरची दैनंदिन मर्यादा हटवण्यात आली आहे. त्यामुळे आता ग्राहकांना त्यांच्या गरजेनुसार कितीही इंधन खरेदी करता येणार आहे. हा निर्णय 12 जूनपासून लागू असलेले तात्पुरते निर्बंध मागे घेतल्यानंतर लागू होणार आहे. (Petrol Diesel Rules)
12 जूनला लागू झाले होते निर्बंध
मध्यपूर्वेतील तणावामुळे जागतिक इंधन पुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाल्यानंतर केंद्र सरकारने 12 जून रोजी तात्पुरते निर्बंध लागू केले होते. त्यानुसार एका वाहनाला दिवसाला जास्तीत जास्त 200 लिटर डिझेल देण्याची मर्यादा होती. तसेच औद्योगिक, व्यावसायिक आणि संस्थात्मक ग्राहकांना रिटेल पंपांऐवजी निश्चित ग्राहक पंपांवरून इंधन घेण्याचे निर्देश देण्यात आले होते. या उपाययोजनांचा उद्देश साठेबाजी, काळाबाजार आणि इंधन वळवणे रोखणे हा होता. (Petrol Diesel Rules)
आता कोणतीही मर्यादा नाही
पेट्रोलियम मंत्रालयाने देशातील इंधन पुरवठ्याची स्थिती सामान्य झाल्याचा आढावा घेतल्यानंतर हे निर्बंध मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे 1 जुलैपासून रिटेल पेट्रोल पंपांवर इंधन खरेदीवर कोणतीही 200 लिटरची मर्यादा राहणार नाही आणि पूर्वीप्रमाणे इंधन विक्री सुरू राहील. (Petrol Diesel Rules)
ट्रान्सपोर्ट क्षेत्राला मोठा दिलासा
या निर्णयाचा सर्वाधिक फायदा ट्रक चालक, बस ऑपरेटर, लॉजिस्टिक्स कंपन्या आणि इतर व्यावसायिक वाहनधारकांना होणार आहे. गरजेनुसार एकाच वेळी इंधन भरता येणार असल्याने वेळेची बचत होईल आणि वाहतुकीचे नियोजनही अधिक सोपे होणार आहे. (Petrol Diesel Rules)






