Ishan Kishan : ‘थांब भाऊ, त्या कामासाठी पंचांना पैसे मिळतात…’, इशानच्या निर्णयावर संतापला माजी खेळाडू

Virender Sehwag on Ishan Kishan controversial dismissal : आयपीएल २०२५ मधील मुंबई इंडियन्स विरुद्धच्या ४१ व्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादचा फलंदाज इशान किशन विचित्र पद्धतीने बाद झाला. त्याच्या विकेटवरून खूप गोंधळ उडाला आहे. दरम्यान, माजी भारतीय क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवागने या प्रकरणावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. प्रामाणिकपणा दाखवल्यानंतर इशान किशन ज्या पद्धतीने पॅव्हेलियनमध्ये परतला तो त्याला आवडला नाही. त्याने एसआरएचच्या फलंदाजावर टीका केली. या सामन्यात नाबाद राहूनही, इशान क्रीज सोडून पॅव्हेलियनमध्ये परतला.
वीरेंद्र सेहवागने इशान किशनला फटकारले –
सामन्यानंतर, क्रिकबझ शोमध्ये बोलताना वीरेंद्र सेहवाग म्हणाला की, ‘इशानने तिथे त्याच्या मेंदूचा वापर करायला हवा होता. त्याला पंचांच्या निर्णयाची वाट पाहायला हवी होती. जर पंचांनी त्याला बाद दिले असते तर त्याला नंतर रिव्ह्यू घेण्याची संधी मिळाली असती.’ तो पुढे म्हणाला की, ‘अशा वेळी मेंदू अनेकदा काम करणे थांबवतो, इशान किशनच्या बाबतीतही असेच घडले. तो म्हणाला की फलंदाजाचे मन थकल्यामुळे हे घडले. त्याने तिथेच थांबून पंचाच्या निर्णयाची वाट पाहायला हवी होती. पंचही पैसे घेत आहेत. त्याला त्याचे काम करू द्यायला हवे होते.’
🚨 ONE OF THE STRANGE MOMENT IN IPL HISTORY 🚨
– Not many MI player appealed.
– Ishan walked away.
– He thought there was an edge.
– Every MI player appreciated the decision of Ishan.
– But replay showed there was no Edge. pic.twitter.com/XhpoSP2EhJ— Johns. (@CricCrazyJohns) April 23, 2025
इशानचा हा प्रामाणिकपणा समजू शकत नाही – वीरेंद्र सेहवाग
वीरेंद्र सेहवाग पुढे म्हणाला की, ‘इशानचा हा प्रामाणिकपणा समजू शकत नाही. जर चेंडू बॅटला लागला असता आणि इशानने हे केले असते, तर ती खेळ भावना ठरली असती. पण तो बाद झाला नव्हता आणि पंचांनाही खात्री नव्हती. तितक्यात इशान अचानक क्रीझ सोडून गेला. मग पंचही दुविधेत सापडतात. अशा परिस्थितीत ते योग्य निर्णय घेऊ शकत नाहीत.’
हेही वाचा – Rohit Sharma : हिटमॅनच्या भाषणाने हार्दिक मंत्रमुग्ध; अनंत अंबानी वाजवत राहिले टाळ्या, पाहा VIDEO
नक्की काय घडलं?
🚨 ISHAN KISHAN DISMISSAL MOMENT 🚨 pic.twitter.com/y75dm8v0bM
— Johns. (@CricCrazyJohns) April 23, 2025
खरंतर ही घटना सनरायझर्स हैदराबादच्या डावाच्या तिसऱ्या षटकात घडली. दीपक चहर मुंबई इंडियन्सकडून षटक टाकत होता. त्या षटकातील पहिला चेंडू चहरने लेग साईडकडे टाकला. या चेंडूवर इशान किशनने शॉट खेळण्याचा प्रयत्न केला पण तो हुकला. त्यानंतर यष्टीरक्षक रिकल्टनने तो झेलला. मात्र, त्यावेळी मुंबई इंडियन्स संघाकडून कोणतेही अपील झाले नाही. असे असूनही, इशान क्रीज सोडून पॅव्हेलियनमध्ये परत जाऊ लागला. यावेळी यष्टीरक्षक रायन रिकेल्टनला स्वतःला खात्री नव्हती की चेंडू बॅटच्या बाहेरील कडाला लागला की नाही. मात्र, इशान किशनला बाहेर जाताना पाहून पंचांनी नंतर त्याला बाद घोषित केले.





