Kishan Replaces Rahul : दुसऱ्या वनडेत टीम इंडियात अचानक मोठा बदल! केएल राहुलला संघातून डच्चू; कर्णधार गिलने सांगितल कारण
Kishan Replaces Rahul : स्टार यष्टिरक्षक-फलंदाज केएल राहुलला या सामन्यातून बाहेर ठेवण्यात आले असून, त्याच्या जागी आक्रमक फलंदाज इशान किशनला संघात संधी देण्यात आली आहे.

IND vs ENG 2nd ODI Playing 11 Ishan Kishan Replaces KL Rahul Cardiff : भारत आणि इंग्लंड यांच्यातील वनडे मालिकेतील दुसरा सामना कार्डिफ येथे खेळवला जात आहे. या अत्यंत महत्त्वाच्या सामन्यात भारतीय संघाने आपल्या प्लेइंग इलेव्हनमध्ये एक मोठा बदल केला आहे. स्टार यष्टिरक्षक-फलंदाज केएल राहुलला या सामन्यातून बाहेर ठेवण्यात आले असून, त्याच्या जागी आक्रमक फलंदाज इशान किशनला संघात संधी देण्यात आली आहे. केएल राहुलला बाहेर ठेवण्यामागचे नेमके कारण काय, याचा खुलासा स्वतः कर्णधार शुबमन गिलने टॉस दरम्यान केला. राहुल आजारी असल्याने तो खेळू शकत नसल्याचे गिलने सांगितले. पहिल्या सामन्यात राहुल अवघ्या १ धावेवर बाद झाला होता.
इशान किशन खेळणार मधल्या फळीत!
इशान किशनला वनडे संघात स्थान मिळाले असले, तरी त्याला सलामीऐवजी मधल्या फळीत (Middle Order) खेळायला उतरावे लागेल. तो पाचव्या किंवा सहाव्या क्रमांकावर फलंदाजी करण्याची शक्यता आहे. इशानने अफगाणिस्तानविरुद्धच्या मागील वनडे मालिकेत लखनऊ येथे १०५ चेंडूंत १२५ धावांचे शानदार शतक झळकावले होते. आता त्याला मधल्या फळीत स्वतःला सिद्ध करावे लागणार आहे.
किशनसाठी ऐतिहासिक सामना –
2nd ODI: ENG Won the Toss & Opt to Bowl
India’s Playing XI pic.twitter.com/Vv3Y5jePES
— 𝑺𝒉𝒆𝒃𝒂𝒔 (@Shebas_10dulkar) July 16, 2026
इशान किशनसाठी हा सामना अतिशय खास आहे. हा खेळाडू तब्बल ३ वर्षांनंतर परदेशी भूमीवर वनडे सामना खेळण्यासाठी मैदानात उतरत आहे. विशेष म्हणजे, इंग्लंडविरुद्ध आणि इंग्लंडच्या भूमीवर खेळण्याचा इशानचा हा कारकिर्दीतील पहिलाच वनडे सामना आहे. इशानने २६ वनडे डावांत ४५.५ च्या सरासरीने आणि १०० हून अधिकच्या स्ट्राईक रेटने १०९२ धावा केल्या आहेत, ज्यात एका द्विशतकाचाही समावेश आहे.
Ishan Kishan has replaced KL Rahul who is sick. pic.twitter.com/rENgrCjiKk
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) July 16, 2026
इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हमध्ये दोन बद्दल –
भारताने या सामन्यात शिवम दुबेला कायम ठेवले असून कुलदीप यादवला पुन्हा संधी मिळालेली नाही. दुसरीकडे, इंग्लंडच्या संघात दोन बदल करण्यात आले असून, जोश टंग आणि लियाम डॉसन ऐवजी साकिब महमूद आणि गस ॲटकिन्सन यांना संधी देण्यात आली आहे.
दुसऱ्या वनडे भारत आणि इंग्लंडची प्लेइंग इलेव्हन –
भारत: रोहित शर्मा, शुबमन गिल (कर्णधार), विराट कोहली, ईशान किशन, श्रेयस अय्यर, वॉशिंग्टन सुंदर, शिवम दुबे, अक्षर पटेल, गुरनूर बरार, जसप्रीत बुमराह, प्रसिद्ध कृष्णा.
इंग्लंड: बेन डकेट, जॅकब बेथेल, जो रूट, हॅरी ब्रुक, जोस बटलर (कर्णधार), सॅम करन, विल जॅक्स, गस ॲटकिन्सन, जोफ्रा आर्चर, आदिल रशीद, साकिब महमूद.





