Rohit Sharma : हिटमॅनच्या भाषणाने हार्दिक मंत्रमुग्ध; अनंत अंबानी वाजवत राहिले टाळ्या, पाहा VIDEO

Rohit Sharma’s IPL 2025 Comeback Powers MI to Victory : मुंबई इंडियन्स (MI) चा माजी कर्णधार रोहित शर्माने आयपीएल २०२५ मध्ये जबरदस्त पुनरागमन केले आहे. त्याने सलग दोन सामन्यात अर्धशतक झळकावून संघाला विजय मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. हैदराबादमध्ये रोहित शर्माने ४६ चेंडूत ७० धावा केल्या. एमआयने सनरायझर्स हैदराबाद (SRH) ला सात विकेट्सनी पराभूत केले. एमआयचा हा सलग चौथा विजय होता. रोहित शर्माला त्याच्या शानदार खेळीसाठी ‘ड्रेसिंग रूम बॅटिंग अवॉर्ड’ मिळाला.
सूर्याने रोहितला दिला ‘ड्रेसिंग रूम बॅटिंग अवॉर्ड’ –
मुंबई इंडियन्स फ्रँचायझीने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला. यामध्ये सूर्यकुमार यादव रोहितला पुरस्कार देताना दिसत आहे. रोहितने सलग दोन सामन्यात अर्धशतके झळकावली आहेत. त्यामुळे एमआय फ्रँचायझीने त्याला ‘ड्रेसिंग रूम बॅटिंग’ पुरस्कार दिला.
ड्रेसिंग रूममध्ये खेळाडूंना संबोधित करताना रोहित शर्मा म्हणाला, ‘आपल्याला सातत्याने चांगली कामगिरी करत राहावे लागेल. सामना सुरू होण्यापूर्वी मी म्हणालो होतो की आपल्याला सातत्याने गोष्टी चांगल्या करायला हव्यात. आज याचे आणखी एक चांगले उदाहरण होते. चला हे चालू ठेवूया.’
Back-to-back 50s ➡ Dressing Room Batting Award 🎖💙
Rohit Sharma hit them all around the ground and we absolutely loved it 🤩#MumbaiIndians #PlayLikeMumbai #TATAIPL #SRHvMI pic.twitter.com/qwPt41b0EV
— Mumbai Indians (@mipaltan) April 24, 2025
हिटमॅनने सलग दोन सामन्यात अर्धशतक झळकावली –
रोहित शर्माची अलीकडील कामगिरी त्याच्या सुरुवातीच्या संघर्षांपेक्षा खूपच वेगळी आहे. ५ वेळा चॅम्पियन असलेला कर्णधार रोहित शर्मा बोलत असताना, त्याच्या शेजारी बसलेला हार्दिक पंड्या शांतपणे ऐकत होता, तर संघाचे मालक आकाश अंबानी बोलणे संपताच उत्साहाने टाळ्या वाजवू लागले. रोहित शर्माच्या फॉर्ममध्ये परतण्याने एमआय संघ खूप आनंदी आहे. रोहितने पहिल्या सहा सामन्यात फक्त ८२ धावा केल्या होत्या. पण गेल्या दोन सामन्यांमध्ये त्याने चमकदार कामगिरी केली आहे. त्याने सीएसके विरुद्ध नाबाद ७६ आणि एसआरएच विरुद्ध ७० धावा केल्या. एमआयसाठी सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रमही रोहित शर्माच्या नावावर आहे. त्याने किरॉन पोलार्डला मागे टाकले आहे.
हेही वाचा – SRH vs MI : पंच विनोद सेशनच्या निर्णयांवर चाहते संतप्त; मुंबईच्या बाजूने निर्णय दिल्याने फिक्सिंगचा आरोप?
२०१६ नंतर रोहितने सलग दोन आयपीएल सामन्यांमध्ये अर्धशतके झळकावण्याची ही पहिलीच वेळ आहे. या हंगामात त्याने आठ सामन्यांमध्ये ३२.५७ च्या सरासरीने आणि १५४.०५ च्या स्ट्राईक रेटने २२८ धावा केल्या आहेत. सनरायझर्स हैदराबादवर विजय मिळवून मुंबई इंडियन्स पॉइंट्स टेबलमध्ये तिसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. त्यांचे ९ सामन्यात १० गुण आहेत. मुंबई इंडियन्स, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, पंजाब किंग्ज आणि लखनऊ सुपर जायंट्स यांचे गुण समान आहेत, परंतु एमआयचा नेट रन रेट चांगला आहे. परंतु मुंबई संघाने इतर संघाच्या तुलनेत एक सामना जास्त खेळला आहे.





