Virat Kohli Replacement : अफगाणिस्तानविरुद्धच्या वनडे मालिकेपूर्वी टीम इंडियात बदल! दुखापतग्रस्त विराटच्या जागी ‘या’ खेळाडूला संधी
Virat Kohli Replacement : मुख्य निवडकर्ते अजित आगरकर यांनी विराट कोहली खेळू शकणार नसल्याच्या वृत्ताला अधिकृत दुजोरा दिला आहे.

Virat Kohli Replacement Yashasvi Jaiswal IND vs AFG ODI Series : अफगाणिस्तानविरुद्धच्या एकमेव कसोटी सामन्यानंतर भारतीय संघ १३ जूनपासून तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळणार आहे. मात्र, या मालिकेपूर्वीच भारताचा दिग्गज फलंदाज विराट कोहली हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीमुळे या संपूर्ण वनडे मालिकेतून बाहेर झाला आहे. मुख्य निवडकर्ते अजित आगरकर यांनी विराट कोहली खेळू शकणार नसल्याच्या वृत्ताला अधिकृत दुजोरा दिला आहे. दरम्यान, बीसीसीआयने तातडीने त्याच्या बदली खेळाडूची घोषणा केली.
बीसीसीआयने विराट कोहली वनडे मालिकेतून बाहेर पडल्यानंतर त्याच्या जागी यशस्वी जैस्वालचा संघात समावेश करत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. कारण विराट कोहलीच्या जागी सीएसकेचा कर्णधार ऋतुराज गायकवाडला संधी दिली जाईल, अशी जोरदार चर्चा होती. मात्र, बीसीसीआयने यशस्वी जैस्वालची निवड करत सर्वांनाच चकित केले आहे.
विराट कोहलीला फॉर्ममध्ये असताना लागला ब्रेक!
So Jaiswal got picked ahead of Ruturaj for the AFG ODIs.
Honestly no complaint because both scored Hundred in their last ODI respectively.
Ideally it should’ve been Ruturaj because Kohli is a middle order batter.
But because Rohit is fit & almost certain to play the series so… pic.twitter.com/5f7hfxwHjz
— Pratyush Halder (@pratyush_no7) June 6, 2026
टी-२० आणि कसोटी क्रिकेटमधून आधीच निवृत्ती घेतलेला विराट कोहली आता भारतासाठी फक्त वनडे फॉरमॅटमध्येच खेळतो. त्याने आपला शेवटचा वनडे सामना जानेवारीत न्यूझीलंडविरुद्ध खेळला होता, जिथे त्याने ८० च्या सरासरीने सर्वाधिक २४० धावा कुटल्या होत्या. त्याचा हाच फॉर्म आयपीएल २०२६ मध्येही पाहायला मिळाला.
BCCI Hon. Secretary Mr. Devajit Saikia informs that Yashasvi Jaiswal will replace the injured Virat Kohli for the #INDvAFG ODI series.#TeamIndia pic.twitter.com/cLxfK7gByz
— BCCI (@BCCI) June 6, 2026
आयपीएल २०२६ मध्ये विराटने ५६.२५ च्या सरासरीने आणि १६५.८४ च्या स्ट्राईक रेटने तब्बल ६७५ धावा ठोकल्या. विशेष म्हणजे, फायनलमध्ये नाबाद ७५ धावांची मॅच विनिंग खेळी खेळून त्याने आरसीबीला सलग दुसऱ्यांदा आयपीएलचे विजेतेपद मिळवून दिले. अशा फॉर्मात असताना विराट दुखापतग्रस्त झाल्याने फॅन्स कमालीचे निराश झाले आहेत.
यशस्वी जैस्वालला मोठी संधी; असे आहे वेळापत्रक!
विराटच्या जागी संधी मिळालेला यशस्वी जैस्वाल सध्या अफगाणिस्तानविरुद्ध एकमेव कसोटी सामना खेळत आहे. तो कसोटी संपताच वनडे संघात सामील होईल. जैस्वालने फेब्रुवारी २०२५ मध्ये इंग्लंडविरुद्ध वनडे पदार्पण केले असून त्याने आतापर्यंत केवळ ४ एकदिवसीय सामने खेळले आहेत. त्यामुळे त्याच्यासाठी ही मोठी परीक्षा असेल. भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील पहिला वनडे सामना १३ जूनला धरमशाला येथे खेळवला जाईल. यानंतर दुसरा सामना १७ जूनला लखनौमध्ये आणि तिसरा सामना २० जूनला चेन्नईमध्ये होणार आहे.





