Suryakumar Yadav Reaction : टीम इंडियातून पत्ता कट झाल्यावर सूर्यकुमार यादवची पहिलीच प्रतिक्रिया; फक्त एका ओळीची इन्स्टा स्टोरी होतेय व्हायरल
Suryakumar Yadav Reaction : संघातून बाहेर पडल्यानंतर माजी कर्णधार सूर्यकुमार यादवने सोशल मीडियावर आपली पहिली प्रतिक्रिया दिली असून, त्याची ही पोस्ट सध्या प्रचंड व्हायरल होत आहे.

Suryakumar Yadav 1st Reaction after Sacked T20I Captaincy : टी-२० विश्वचषक २०२६ चे विजेतेपद जिंकून देणाऱ्या सूर्यकुमार यादवला अचानक कर्णधारपदावरून हटवले जाईल आणि थेट संघातूनच डच्चू दिला जाईल, अशी कल्पना क्रिकेट जगतात कोणीही केली नव्हती. बीसीसीआयने आगामी दौऱ्यांसाठी श्रेयस अय्यरला नवा टी-२० कर्णधार नियुक्त करून सर्वांनाच मोठा धक्का दिला आहे. श्रेयसने गेल्या तीन वर्षांत एकही आंतरराष्ट्रीय टी-२० सामना खेळलेला नाही, तरीही त्याच्याकडे ही धुरा आली आहे. या सर्व धक्कादायक घडामोडींनंतर आणि संघातून बाहेर पडल्यानंतर माजी कर्णधार सूर्यकुमार यादवने सोशल मीडियावर आपली पहिली प्रतिक्रिया दिली असून, त्याची ही पोस्ट सध्या प्रचंड व्हायरल होत आहे.
सूर्याची इंस्टा स्टोरी; एका ओळीत जिंकली मनं!
संघ निवडीनंतर सूर्यकुमार यादवने त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर एक स्टोरी पोस्ट केली आहे. या स्टोरीमध्ये त्याने नव्याने निवडलेल्या भारतीय संघाचा फोटो शेअर केला आहे. सूर्याने या फोटोसोबत अत्यंत छोटा पण मनाला भिडणारा कॅप्शन लिहिला आहे. त्याने लिहिले, “या टॅलेंटेड संघाला पुढील आव्हानांसाठी खूप खूप शुभेच्छा!” या ओळीसोबत सूर्याने भारतीय तिरंग्याचा इमोजी देखील जोडला आहे. संघातून बाहेर होऊनही त्याने नव्या खेळाडूंचे वाढवलेले मनोधैर्य चाहत्यांच्या पसंतीस उतरत आहे.
Instagram story of Suryakumar Yadav pic.twitter.com/Ll3UsFq4ow
— Pijush Saha (@sahapijush7) June 6, 2026
शानदार रेकॉर्ड असूनही खराब फॉर्ममुळे पत्ता कट!
SuryaKumar Yadav Instagram story for Vaibhav Suryavanshi.🇮🇳🫡 pic.twitter.com/DR56iaSamc
— Gyanu Gautam (@GyanuCricket) June 6, 2026
२०२४ च्या टी-२० विश्वचषकानंतर सूर्याकडे भारताचे नियमित कर्णधारपद सोपवण्यात आले होते. त्याच्या नेतृत्वाखाली भारताने एकही द्विपक्षीय मालिका गमावली नाही. इतकेच नव्हे तर, भारताला आशिया चषक आणि टी-२० विश्वचषक २०२६ च्या ट्रॉफी जिंकून देण्यात त्याचा मोठा वाटा होता. मात्र, गेल्या काही महिन्यांत त्याची बॅट पूर्णपणे शांत होती. आयपीएल २०२६ मध्येही तो अपयशी ठरला. त्याचा हाच खराब फॉर्म त्याच्या हकालपट्टीचे मुख्य कारण ठरला.
दुसरीकडे, नव्या कर्णधाराची म्हणजेच श्रेयस अय्यरची वाट सोपी नसेल. त्याने आयपीएलमध्ये तीन वेगवेगळ्या संघांचे नेतृत्व केले असून त्याला १०० हून अधिक सामन्यांचा अनुभव आहे, परंतु आंतरराष्ट्रीय स्तरावर तो पहिल्यांदाच भारताचे नेतृत्व करेल. १ जुलैपासून सुरू होणाऱ्या इंग्लंडविरुद्धच्या पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेत श्रेयसचा खरा कस लागणार आहे.





