Virat Kohli Injury : टीम इंडियाला मोठा धक्का! अफगाणिस्तानविरुद्धच्या वनडे मालिकेतून स्टार खेळाडू बाहेर, नेमकं कारण काय?
Virat Kohli Injury : ६ जूनपासून सुरू होणाऱ्या भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील मालिकेची जय्यत तयारी सुरू असताना एक मोठी बातमी समोर आली आहे.

Virat Kohli Ruled Out Of IND vs AFG ODI Series Injury : आयपीएल २०२६ (IPL2026) चे जेतेपद रॉयल चॅलेंजर्स बेंगलुरुला मिळवून दिल्यानंतर अवघ्या काही दिवसांतच ‘किंग’ विराट कोहली आणि त्याच्या करोडो चाहत्यांसाठी एक अत्यंत वाईट आणि धक्कादायक बातमी समोर आली आहे. ६ जूनपासून सुरू होणाऱ्या भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील मालिकेची जय्यत तयारी सुरू असतानाच, विराट कोहली हॅमस्ट्रिंगच्या गंभीर दुखापतीमुळे आगामी ३ सामन्यांच्या एकदिवसीय (वनडे) मालिकेतून पूर्णपणे बाहेर पडला आहे. यामुळे भारतीय संघाच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे. (Virat Kohli Injury )
आयपीएल २०२६ च्या फायनलमध्ये झाली होती दुखापत! (Virat Kohli Injury)
३१ मे रोजी अहमदाबाद येथे झालेल्या आयपीएलच्या अंतिम सामन्यात आरसीबीकडून खेळताना विराटने ४२ चेंडूंत ७५ धावांची नाबाद आणि ऐतिहासिक खेळी केली होती. त्याने विनिंग सिक्स मारत संघाला सलग दुसऱ्यांदा चॅम्पियन बनवले. मात्र, या फलंदाजीदरम्यान विराटला दुखापतीचा प्रचंड त्रास जाणवत होता. सामन्यात अनेकवेळा फिजिओला मैदानात येऊन विराटवर उपचार करावे लागले होते. आता याच दुखापतीचे स्वरूप गंभीर असल्याचे समोर आले असून, वैद्यकीय अहवालानंतर (रिपोर्ट्स) त्याला विश्रांतीचा सल्ला देण्यात आला आहे.
🚨 VIRAT KOHLI RULED OUT OF THE ODI SERIES AGAINST AFGHANISTAN. 🚨
– Virat has been ruled out due to hamstring injury. (PTI). pic.twitter.com/GrDisu31hd
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) June 4, 2026
विजयानंतर पोहोचला होता वृंदावनला! (Virat Kohli Injury)
आयपीएल जिंकल्यानंतर विराट कोहली पत्नी अनुष्का शर्मासोबत थेट वृंदावन येथे दर्शनासाठी पोहोचला होता. तेथे दोघांनीही प्रसिद्ध प्रेमानंद महाराज यांचे आशीर्वाद घेतले. यादरम्यान विराट कोहली मनोभावे ‘राधे राधे’ बोलतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला होता. यानंतर त्याच्या विमानतळावरील (एअरपोर्ट) एका व्हिडिओने आणि त्याच्या टी-शर्टवरील मेसेजनेही चाहत्यांचे लक्ष वेधले होते. मात्र, या धार्मिक दौऱ्यानंतर तो थेट क्रिकेटच्या मैदानावर पुनरागमन करेल अशी आशा असतानाच दुखापतीने घात केला.
डब्लूटीसी आणि आगामी मालिकेचे समीकरण! (Virat Kohli Injury)
बीसीसीआयने आयपीएल सुरू असतानाच अफगाणिस्तानविरुद्धच्या कसोटी आणि वनडे मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा केली होती. विराट कोहलीच्या जागी आता संघात कोणाला संधी मिळणार, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. या मालिकेतील पहिले दोन वनडे सामने धरमशाला आणि शेवटचा सामना चेन्नईत खेळवला जाणार आहे.
भारत-अफगाणिस्तान वनडे मालिकेचे वेळापत्रक : (Virat Kohli Injury)
- १ ला वनडे सामना: १३ जून – धरमशाला
- २ रा वनडे सामना: १७ जून – धरमशाला
- ३ रा वनडे सामना: २० जून – चेन्नई
अफगाणिस्तानविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी घोषित झालेला भारतीय संघ:
शुबमन गिल (कर्णधार), रोहित शर्मा, विराट कोहली (दुखापतीमुळे बाहेर), श्रेयस अय्यर (उपकर्णधार), के. एल. राहुल (यष्टीरक्षक), इशान किशन (यष्टीरक्षक), हार्दिक पांड्या, नितीश कुमार रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग, प्रसिद्ध कृष्णा, प्रिन्स यादव, गुरनूर ब्रार, हर्ष दुबे.





