Virat Kohli : किंग कोहलीचा वर्ल्ड रेकॉर्ड! सचिन तेंडुलकरला मागे टाकत लावली विक्रमांची रांग

Virat Kohli Century Record : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील पहिल्या सामन्यात स्टार फलंदाज विराट कोहलीने एक ऐतिहासिक शतक झळकावली. या शानदार शतकासह विराटने संपूर्ण क्रिकेट जगतात खळबळ माजवली आहे. कोहलीने या महत्त्वपूर्ण सामन्यात केवळ 102 चेंडूंमध्ये आपले शतक पूर्ण केले. यासह त्याने सचिन तेंडुलकरला मागे टाकत अनेक विक्रम केले.
एका फॉर्मेटमध्ये सर्वाधिक शतकांचा विश्वविक्रम –
या शतकासोबतच, विराट कोहलीने क्रिकेट इतिहासातील एक असा पराक्रम प्रस्थापित केला आहे, ज्याला पार करणे जवळपास अशक्य मानले जात होते. हे कोहलीच्या एकदिवसीय कारकिर्दीतील 52 वे शतक आहे. या 52 व्या शतकामुळे, विराट कोहली आता एका आंतरराष्ट्रीय फॉर्मेटमध्ये सर्वाधिक शतके झळकावणारा जगातील पहिला फलंदाज बनला आहे. विराटने 120 चेंडूत 11 चौकार आणि 7 षटकार ठोकत 135 धावांची खेळी साकारली.
A leap of joy ❤️💯ं
A thoroughly entertaining innings from Virat Kohli 🍿
Updates ▶️ https://t.co/MdXtGgRkPo#TeamIndia | #INDvSA | @IDFCFIRSTBank | @imVkohli pic.twitter.com/llLByyGHe5
— BCCI (@BCCI) November 30, 2025
यापूर्वी, तो 51 शतकांसह महान फलंदाज सचिन तेंडुलकर (टेस्ट फॉर्मेटमध्ये 51 शतके) यांच्या विक्रमाशी बरोबरी करत होता. कोहलीचा हा पराक्रम त्याला क्रिकेट इतिहासाच्या शिखरावर घेऊन जातो. दीर्घकाळानंतर विराट कोहली इतक्या जबरदस्त फॉर्ममध्ये दिसला असून, त्याच्या खेळीमध्ये क्लास आणि आक्रमकतेचा उत्कृष्ट संगम पाहायला मिळाला.
हेही वाचा – Abhishek Sharma : अभिषेक शर्माने ठोकलं वादळी शतक! रोहित शर्माच्या विक्रमाशी केली बरोबरी
दक्षिण आफ्रिकेविरुद्धही नवा भारतीय विक्रम –
विश्वविक्रम मोडण्यासोबतच, विराट कोहलीने दक्षिण आफ्रिकेविरुद्धही एक नवा विक्रम रचला आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध त्याच्या वनडे कारकिर्दीतील हे सहावे शतक आहे. या शतकासह, तो आता दक्षिण आफ्रिकेविरुद्ध एकदिवसीय फॉर्मेटमध्ये सर्वाधिक शतके (6 शतके) झळकावणारा पहिला भारतीय फलंदाज ठरला आहे.
अलीकडेच झालेल्या कसोटी मालिकेत पराभव झाल्यानंतर कोहलीचे अशा फॉर्ममध्ये परतणे टीम इंडियासाठी खूप मोठी आणि दिलासादायक बातमी आहे. त्याची ही खेळी केवळ भारताला एक मजबूत धावसंख्या उभारण्यास मदत करणार नाही, तर आगामी सामन्यांसाठी संघाचे मनोबलही वाढवेल. चाहते अशी आशा व्यक्त करत आहेत की, कोहली आपला हा शानदार फॉर्म कायम ठेवेल आणि भारताला ही मालिका जिंकून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावेल.





