SA vs WI 1st Test : अलिक अथानाझेची लढाऊ खेळी, वेस्ट इंडिज-दक्षिण आफ्रिका पहिली कसोटी ड्रॉ..! जाणून घ्या, WTC Points Table ची स्थिती…

SA vs WI 1st Test : दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडिज यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना अनिर्णित (ड्रॉ) राहिला. अलिक अथानाझेच्या 92 धावांच्या लढाऊ खेळीच्या जोरावर वेस्ट इंडिजने सामन्याच्या पाचव्या दिवशी दुसऱ्या डावात पाच गडी गमावून 201 धावसंख्येपर्यंत मजल मारली होती. यानंतर सामना अनिर्णित घोषित करण्यात आला. 2024 मध्ये पहिल्यांदाच कसोटी सामना अनिर्णित राहिला आहे. यापूर्वी 2024 मध्ये झालेल्या सर्व कसोटी सामन्यांचे निकाल लागले आहेत.
दक्षिण आफ्रिकेकडून केशव महाराजने शानदार गोलंदाजी केली. त्याने एकूण 8 विकेट घेतल्या. त्याच्या दमदार कामगिरीमुळे त्याला प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार देण्यात आला.
The 1️⃣st test ends at Queen’s Park Oval with both teams taking a share of the spoils. 🏏🌴#WIvSA #MenInMaroon pic.twitter.com/KH0STFFuuq
— Windies Cricket (@windiescricket) August 11, 2024
दक्षिण आफ्रिकेने पहिल्या डावात सर्वबाद 357 धावा केल्या होत्या. कर्णधार टेंबा बावुमा (86 धावा), टोनी डी जॉर्जी (78 धावा) यांनी संघासाठी चांगली फलंदाजी केली. या खेळाडूंमुळेच आफ्रिकन संघ पहिल्या डावात मोठी धावसंख्या उभारण्यात यशस्वी ठरला. यानंतर वेस्ट इंडिजच्या खेळाडूंना पहिल्या डावात चांगली कामगिरी करता आली नाही. वेस्ट इंडिजचा पहिला डाव 233 धावांवरच आटोपला. त्यामुळे आफ्रिकेला पहिल्या डावाच्या आधारे 124 धावांची आघाडी मिळाली होती.
यानंतर दुसऱ्या डावात आफ्रिकेच्या फलंदाजांनी आक्रमक फलंदाजी केली. ट्रिस्टन स्टब्सने 50 चेंडूत 68 धावा केल्या. टोनी डी जॉर्जीने 45 धावांचे योगदान दिले आणि संघाने 3 बाद 173 धावा करून डाव घोषित केला. अशाप्रकारे वेस्ट इंडिजला विजयासाठी 298 धावांचे लक्ष्य मिळाले होते. वेस्ट इंडिजसाठी दुसऱ्या डावात ॲलेक अथनाजेने फलंदाजीचे उत्कृष्ट उदाहरण मांडले. त्याने 92 धावा केल्या. जेसन होल्डर 31 धावा केल्यानंतर नाबाद राहिला, पण अखेर सामना अनिर्णित राहिला. आता 15 ऑगस्टपासून उभय संघांमधील दुसरा कसोटी सामना खेळवला जाणार आहे.
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या पॉइंट टेबलमधील स्थिती….
वेस्ट इंडिज आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिली कसोटी रद्द झाल्यामुळे टीम इंडियाला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या पॉइंट टेबलमध्ये कोणताही फरक पडला नाही. या सामन्यापूर्वीही टीम इंडिया पहिल्या क्रमांकावर होती आणि आजही पहिल्या क्रमांकावर आहे.
The latest #WTC25 table after West Indies and South Africa play out a draw in Trinidad 🏏
Full standings 👉 https://t.co/F3gyovqND7#WIvSA pic.twitter.com/YJbTv5f1hL
— ICC (@ICC) August 12, 2024
टीम इंडियाने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2023-25 सायकलमध्ये आतापर्यंत 9 कसोटी सामने खेळले आहेत. भारताने 9 पैकी 6 सामने जिंकले, 2 सामने गमावले आणि 1 सामना अनिर्णित राहिला. टीम इंडियाची विजयाची टक्केवारी 68.51 इतकी आहे.
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या पॉइंट टेबलमध्ये दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडिजचे संघ तळाशी आहेत. आफ्रिका 7व्या स्थानावर आहे, तर वेस्ट इंडिज 9व्या म्हणजेच शेवटच्या स्थानावर आहे. सध्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या चालू चक्रात टीम इंडिया अव्वल स्थानावर आहे. त्यानंतर ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, श्रीलंका, पाकिस्तान आणि इंग्लंड या संघांचा क्रमांक लागतो.




