Vikas Kohli : विराट कोहलीचा भाऊ IPL 2025 दरम्यान संजय मांजरेकरवर का संतापला? जाणून घ्या कारण

Virat Kohli’s Brother Vikas Slams Sanjay Manjrekar : आयपीएल २०२५ मध्ये आरसीबीने सातत्याने चांगली कामगिरी केली आहे. त्यामुळे संघ सध्या पॉइंट्स टेबलमध्ये अव्वल स्थानावर आहे. यामध्ये माजी संघ कर्णधार आणि स्टार फलंदाज विराट कोहलीची महत्त्वाची भूमिका आहे. कोहलीने गेल्या हंगामाप्रमाणे पुन्हा एकदा धावा काढण्याचा आपला सपाटा सुरू ठेवला आहे आणि आतापर्यंत त्याने ६ अर्धशतके झळकावली आहेत. पण असे असूनही, त्याच्या फलंदाजीबद्दल प्रश्न उपस्थित केल्याने विराटचा भाऊ माजी खेळाडूवर चांगलाच संतापला.
आयपीएलमध्ये समालोचन करणारे माजी भारतीय क्रिकेटपटू संजय मांजरेकर यांनी अलीकडेच सोशल मीडियावर या हंगामातील सर्वात प्रभावी फलंदाजांची यादी पोस्ट केली होती. ज्यामध्ये अशा खेळाडूंना स्थान दिले होते, ज्यांनी केवळ भरपूर धावा केल्या नाहीत तर त्यांचा स्ट्राइक रेटही खूप जास्त आहे. मांजरेकरने त्यांच्या यादीत विराट कोहलीचा समावेश केला नाही, जो या हंगामात आतापर्यंत सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंमध्ये आहे, परंतु त्याचा स्ट्राइक रेट इतरांपेक्षा कमी आहे.
When it comes to batting only list that matters.Big runs with great SR so far.
Pooran : 377 runs SR 205
Priyansh Arya : 254 runs SR 202
Shreyas : 263 runs SR 185
Surya : 373 runs SR 167
Buttler : 356 runs SR 166
Mitchell Marsh : 344 runs SR 161
Travis Head: 261 runs SR…
— Sanjay Manjrekar (@sanjaymanjrekar) April 26, 2025
विराटचा भाऊ मांजरेकरवर संतापला –
तेव्हापासून मांजरेकर जाणूनबुजून कोहलीची निवड करत नाहीत का? यावर चर्चा सुरू आहे. तसेच प्रश्नही उपस्थित केले जात आहेत. कारण जेव्हा जेव्हा कोहलीने अर्धशतक केले आहे तेव्हा त्याच्या संघाने सामना जिंकला आहे. अशा परिस्थितीत, त्याच्या स्ट्राईक रेटबद्दलची चर्चा कितपत योग्य आहे? कदाचित विराटचा भाऊ विकास कोहलीलाही ही चर्चा लक्षात आली असेल आणि तो स्वतःला रोखू शकला नाही.
हेही वाचा – Shahid Afridi : ‘और कितना गिरोगे…’, पहलगाम हल्ल्यावर आफ्रिदीच्या वक्तव्याला धवनचे चोख प्रत्युत्तर
संजय मांजरेकरच्या स्ट्राइक रेटवर उपस्थित केला सवाल –
Virat Kohli’s brother Vikas Kohli on threads pic.twitter.com/a7FXKsODR0
— RCBIANS OFFICIAL (@RcbianOfficial) April 29, 2025
विकास कोहलीने सोशल मीडियावरील त्याच्या एका पोस्टमध्ये त्यानी संजय मांजरेकरच्या एकदिवसीय सामन्यातील स्ट्राईक रेटचा उल्लेख केला, जो फक्त ६४.३१ आहे. त्यानंतर पुढे लिहिले की, “२०० पेक्षा जास्त स्ट्राईक रेटबद्दल बोलणे खूप सोपे आहे.” विकास कोहलीची ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली आणि अनेक लोक त्याचे समर्थन करत असताना, काही जण असेही म्हणत आहेत की कुटुंबाने अशा प्रकरणांमध्ये अडकू नये.
हेही वाचा – DC vs KKR : कुलदीपने रिंकूच्या कानशिलात मारल्यानंतर DC आणि KKR चा मोठा खुलासा, पाहा VIDEO
चाहत्यांच्या समिश्र प्रतिक्रिया –
तसेच, काही युजर्स मांजरेकरांच्या यादीचे आणि त्यांच्या युक्तिवादांचे समर्थन करत आहेत. विराट कोहलीच्या कामगिरीबद्दल बोलायचे झाले तर, या स्टार फलंदाजाने आतापर्यंत १० सामन्यांमध्ये ६३ च्या सरासरीने ४४३ धावा केल्या आहेत, ज्यामध्ये त्याचा स्ट्राईक रेट १३८.८७ आहे. सर्वाधिक धावा करणाऱ्या टॉप २० खेळाडूंमध्ये हे सर्वात कमी आहे. तथापि, जेव्हा जेव्हा त्याने धावा केल्या आहेत, तेव्हा आरसीबीने प्रत्येक सामना जिंकला आहे.





