RCB vs CSK : विराट कोहली ठरला नवा सिक्सर किंग! रोहित-गेलला जे जमलं नाही ते करुन दाखवलं

Virat Kohli completes 300 sixes in T20 cricket : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) चा अनुभवी फलंदाज विराट कोहलीने टी-२० क्रिकेटमध्ये एक नवीन ऐतिहासिक कामगिरी केली आहे. एकाच टी-२० फ्रँचायझीसाठी ३०० षटकार मारणारा कोहली पहिला फलंदाज ठरला. बंगळुरूमधील एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर चेन्नई सुपर किंग्जविरुद्धच्या सामन्यात त्याने हा विक्रम केला. सामन्याच्या तिसऱ्या षटकात सलग दोन शानदार षटकार मारून त्याने हा टप्पा गाठला.
पहिला षटकार मारून विराट कोहलीने त्याचा ३०० वा षटकार पूर्ण केला. त्यानंतर लगेचच त्याने आणखी एक षटकार मारला. या षटकारासह त्याने ३०१ षटकार मारले. सर्वाधिक षटकार मारण्याच्या बाबतीत विराट कोहली अव्वल स्थानावर आहे. त्याच्या मागे ख्रिस गेल आहे. ज्याने २६३ षटकार मारले आहेत. रोहित शर्मा २६२ षटकारांसह तिसऱ्या स्थानावर आहे.
When grace meets power, records take flight! 👑🫡
He's now at 3️⃣0️⃣1️⃣ sixes. 🤌#PlayBold #ನಮ್ಮRCB #IPL2025 #RCBvCSK pic.twitter.com/OPmUcGwpny
— Royal Challengers Bengaluru (@RCBTweets) May 3, 2025
टी-२० क्रिकेटमध्ये एका संघासाठी सर्वाधिक षटकार मारणारे फलंदाज :
३०४ – विराट कोहली (आरसीबी)*
२६३ – ख्रिस गेल (आरसीबी)
२६२ – रोहित शर्मा (एमआय)
२५८ – किरॉन पोलार्ड (एमआय)
२५७ – एमएस धोनी (सीएसके)
हेही वाचा – RCB vs CSK : ‘जेलची जर्सी’ दाखवून CSK चे स्वागत; सामन्यापूर्वी RCB च्या चाहत्यांनी केले ट्रोल, पाहा VIDEO
या षटकारासह, तो एका मैदानावर सर्वाधिक षटकार मारणारा खेळाडूही बनला. त्याने या बाबतीत ख्रिस गेलला मागे टाकले. आता चिन्नास्वामी स्टेडियमवर विराट कोहलीने १५२ षटकार मारले आहेत.
टी-२० क्रिकेटमध्ये एकाच मैदानावर सर्वाधिक षटकार मारणारे खेळाडू –
१५५* – विराट कोहली, बंगळुरू
१५१ – ख्रिस गेल, बंगळुरू
१३८ – ख्रिस गेल, मिरपूर
१३५ – अॅलेक्स हेल्स, नॉटिंगहॅम
१२२ – रोहित शर्मा, वानखेडे
हेही वाचा – Kagiso Rabada Ban : गुजरात टायटन्सला मोठा धक्का! स्टार वेगवान गोलंदाजावर ड्रग्ज प्रकरणी बंदी
विराटने डेव्हिड वॉर्नरच्या विक्रमाची केली बरोबरी –
चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध विराट कोहली वेगळ्या लयीत दिसला. त्याने अर्धशतक पूर्ण होईपर्यंत ५ षटकार मारले. विराट कोहली ३३ चेंडूत ६२ धावा काढून बाद झाला. यादरम्यान त्याने ५ चौकार आणि ५ षटकार मारले. यासह, विराटचे आयपीएलमधील हे ६२ वे अर्धशतक आहे. सर्वाधिक अर्धशतके झळकावण्याच्या बाबतीत तो संयुक्तपणे पहिल्या स्थानावर पोहोचला आहे. डेव्हिड वॉर्नरच्या नावावर ६२ अर्धशतके आहेत.





