Akash Deep Marriage : “त्यांना बोलावलं असतं तर…” धोनी, विराट आणि रोहितला लग्नाचे आमंत्रण का दिलं नाही? आकाश दीपने केला खुलासा
Akash Deep Marriage : दिमाखदार सोहळ्याला प्रसिद्ध भोजपुरी गायक पवन सिंह आणि आकाशचा जवळचा मित्र तसेच टीम इंडियाचा गोलंदाज मुकेश कुमार यांनी हजेरी लावली होती.

Akash Deep Marriage For Not Inviting MS Dhoni Virat Kohli Rohit Sharma : भारतीय क्रिकेट संघाचा वेगवान गोलंदाज आकाश दीप नुकताच अक्षिता राज हिच्यासोबत वाराणसीतील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये विवाहबंधनात अडकला. या दिमाखदार सोहळ्याला प्रसिद्ध भोजपुरी गायक पवन सिंह आणि आकाशचा जवळचा मित्र तसेच टीम इंडियाचा गोलंदाज मुकेश कुमार यांनी हजेरी लावली होती. मात्र, या विवाह सोहळ्यात एमएस धोनी, विराट कोहली आणि रोहित शर्मा यांसारख्या स्टारची कमतरता प्रकर्षाने जाणवली. या दिग्गजांना लग्नाला का बोलावले नाही? असा थेट प्रश्न एका तरुणाने विचारताच आकाश दीपने दिलेले उत्तर सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
…तर वाराणसीत लग्न होऊ शकले असते का?
धोनी, विराट आणि रोहितला न बोलावण्यामागचे कारण सांगताना आकाश दीप हसून म्हणाला, “जर त्यांना बोलावले असते, तर मग इथे वाराणसीत शांततेत लग्न होऊ शकले असते का? त्यांना आमंत्रित करण्यासाठी मला माझे लग्न देशाबाहेर (परदेशात) किंवा एखाद्या गुप्त ठिकाणी करावे लागले असते.” आकाशच्या या उत्तरावर लग्नातील सर्वच पाहुणे पोट धरून हसू लागले. त्याच्या बोलण्याचा स्पष्ट अर्थ असा होता की, जर हे तीनही दिग्गज वाराणसीत आले असते, तर त्यांच्या एका झलकसाठी चाहत्यांची प्रचंड गर्दी झाली असती आणि सुरक्षा व्यवस्था सांभाळणे कठीण झाले असते.
Look at Aakash Deep’s reaction when his friend asked, “Bhaiya, aapne Virat Kohli Bhaiya, Dhoni Bhaiya aur Rohit Bhaiya ko apni shaadi mein kyun nahi bulaya?”
Aakash Deep replied, “Phir yahan shaadi nahi ho paati, bahar karni padti.” 😂 pic.twitter.com/9vAgnwupVi
— Sonu (@Cricket_live247) June 25, 2026
क्रिकेटर ते थेट डीएसपी –
Congratulations to Akash Deep and Akshita on their wedding! Wishing them a lifetime of love and happiness.❤️ pic.twitter.com/mmURJtWiIX
— Rohit Nation (@Rohitnation45) June 25, 2026
आकाश दीपने भारतासाठी आतापर्यंत १० कसोटी सामने खेळले असून त्यात २८ विकेट्स घेतले आहेत. मैदानावर चमकदार कामगिरी करणाऱ्या आकाशच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. बिहार सरकारने क्रीडा कोट्याअंतर्गत आकाश दीप आणि मुकेश कुमार या दोघांचीही थेट डीएसपी पदावर नियुक्ती केली आहे, अशी मोठी माहिती स्वतः आकाशने लग्नादरम्यान दिली.
कोण आहे आकाश दीपची पत्नी अक्षिता राज?
आकाशची पत्नी अक्षिता राज ही देखील बिहारच्या रोहतास जिल्ह्यातीलच रहिवासी आहे. ती डेहरी परिसरातील मानिकपुर गावची असून तिचे वडील अमित सिंह हे नामांकित गृहस्थ आहेत. अक्षिताचे शालेय आणि उच्च शिक्षण डेहरीमध्येच पूर्ण झाले आहे. स्थानिक लोकांच्या मते, अक्षिता अत्यंत शांत आणि साध्या स्वभावाची मुलगा आहे. भारतीय संघात मोठी ओळख मिळाल्यानंतरही आकाश दीपने कोणत्याही हाय-फाय पद्धतीऐवजी आपल्या कुटुंबाच्या पसंतीला मान दिला आणि अगदी पारंपारिक रीतीरिवाजांनुसार लग्न केले, ज्याचे कौतुक सध्या संपूर्ण परिसरात होत आहे.





