Kagiso Rabada Ban : गुजरात टायटन्सला मोठा धक्का! स्टार वेगवान गोलंदाजावर ड्रग्ज प्रकरणी बंदी

Kagiso Rabada Ban after drug test positive : दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज कागिसो रबाडा पहिल्या दोन सामन्यांनंतर आयपीएल २०२५ सोडून आपल्या देशात परतला. तो गुजरात टायटन्स संघाचा भाग आहे. सुरुवातीला असे वृत्त होते की रबाडा वैयक्तिक कारणांमुळे मायदेशी परतला आहे. पण वैयक्तिक कारण काय होते हे कोणालाही माहिती नव्हते. आता रबाडाने स्वतः एक निवेदन जारी करून तो दक्षिण आफ्रिकेत परतण्याचे कारण स्पष्ट केले आहे. रबाडाल ड्रग्ज प्रकरणात दोषी आढळल्याने बंदी घालण्यात आली आहे.
ड्रग्ज प्रकरणात दोषी आढळल्याने रबाडावर बंदी –
दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज कागिसो रबाडा याच्यावर ड्रग्जच्या वापरामुळे तात्पुरती बंदी घालण्यात आली आहे. ही बातमी शनिवारी आली. रबाडाने स्वतः एक निवेदन जारी करून ही माहिती दिली. रबाडाने कबूल केले की त्याने असे काहीतरी वापरले जे नियमांविरुद्ध होते. यामुळे त्याला क्रिकेटपासून तात्पुरते दूर राहावे लागेल. त्यांनी याबद्दल माफीही मागितली आहे. गुजरातने रबाडाला खरेदी करण्यासाठी १०.७५ कोटी रुपये खर्च केले होते.
🚨 STATEMENT FROM KAGISO RABADA 🚨
– Rabada serving a provisional suspension after an adverse analytical finding of the use of a Recreational Drug. pic.twitter.com/Odyx04x1fl
— Johns. (@CricCrazyJohns) May 3, 2025
कागिसो रबाडा निवेदनात काय म्हणाला?
कागिसो रबाडा यांनी त्यांच्या निवेदनात म्हटले आहे की, “सांगितल्याप्रमाणे, मी अलीकडेच वैयक्तिक कारणांमुळे आयपीएल २०२५ च्या मध्यभागी दक्षिण आफ्रिकेला परतलो आहे. हे घडले कारण माझी एक ड्रग्ज टेस्टमध्ये घेण्यात आली होती. ज्यामध्ये मी पॉझिटिव्ह आढळलो आहे. त्यामुळे मी ज्या लोकांना निराश केले आहे त्या सर्वांची मनापासून माफी मागतो. क्रिकेट खेळण्याच्या विशेषाधिकाराला मी कधीही गृहीत धरणार नाही. हा विशेषाधिकार माझ्यापेक्षा खूप मोठा आहे. हे माझ्या वैयक्तिक आकांक्षांच्या पलीकडे आहे.”
हेही वाचा – RCB vs CSK : ‘जेलची जर्सी’ दाखवून CSK चे स्वागत; सामन्यापूर्वी RCB च्या चाहत्यांनी केले ट्रोल, पाहा VIDEO
कागिसो रबाडाने मानले आभार –
कागिसो रबाडाने त्याच्या कठीण काळात ज्यांनी त्याला साथ दिली, त्यांचे आभार मानले. तो म्हणाला, “मी माझ्या एजंट, क्रिकेट साउथ आफ्रिका आणि गुजरात टायटन्स यांचे त्यांच्या पाठिंब्याबद्दल आभार मानू इच्छितो. मी दक्षिण आफ्रिकन क्रिकेटर्स असोसिएशन आणि माझ्या लीगल टीमचे त्यांच्या मार्गदर्शन आणि सल्ल्याबद्दल आभार मानू इच्छितो. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, मी माझ्या मित्रांचे आणि कुटुंबियांचे त्यांच्या समजूतदारपणा आणि प्रेमाबद्दल आभार मानू इच्छितो.”





