Vinayak Raut : विनायक राऊत यांना मोठा धक्का; सुनेच्या आरोपांनंतर पोलीस…
Vinayak Raut : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि माजी खासदार विनायक राऊत यांच्या अडचणीत कमालीची वाढ झाली आहे.

Vinayak Raut : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे माजी खासदार विनायक राऊत यांना आणखी एक धक्का बसला आहे. त्यांच्या सुनेने केलेल्या गंभीर आरोपांनंतर आता त्यांचे पोलीस संरक्षणही मागे घेण्यात आले आहे. संरक्षण शाखा-1 ने संरक्षण कायम ठेवण्याची त्यांची मागणी फेटाळल्याची माहिती समोर आली आहे. (Vinayak Raut)
माहितीनुसार, यापूर्वी ३० मे रोजी संरक्षण काढण्याबाबत अधिकृत पत्र देण्यात आले होते. त्यानंतर विनायक राऊत यांनी पुन्हा पत्र देत सुरक्षा कायम ठेवण्याची विनंती केली होती. मात्र, संरक्षण शाखेने ती मागणी मान्य केली नाही. (Vinayak Raut)
Vinayak Raut : शिंदे हे नपुंसक राजकारणी; विनायक राऊत यांची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर टीका
दरम्यान, राऊत यांच्या सून गिरीजा राऊत यांनी विनायक राऊत आणि त्यांचे पुत्र गितेश राऊत यांच्यावर मानसिक छळासह अन्य गंभीर आरोप केले आहेत. या प्रकरणात ठाण्यात गुन्हा दाखल झाल्याचीही माहिती समोर आली असून, त्यानंतर संरक्षण मागे घेतल्याने या घडामोडींना अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे. (Vinayak Raut)
या पार्श्वभूमीवर पत्रकार परिषद घेत विनायक राऊत यांनी सर्व आरोप फेटाळून लावले. “माझे पोलीस संरक्षण मागील महिन्यात काढण्यात आले. ते कायम ठेवण्याची विनंती करूनही ती स्वीकारली गेली नाही,” असे त्यांनी सांगितले. (Vinayak Raut)
तसेच, सुनेच्या आरोपांमागे राजकीय षडयंत्र असल्याचा दावा करत, योग्य वेळी त्यामागील सूत्रधाराचे नाव जाहीर करू, असेही राऊत म्हणाले. न्यायव्यवस्थेवर विश्वास असल्याने सत्य समोर येईल आणि आम्ही या प्रकरणातून बाहेर पडू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. (Vinayak Raut)

याशिवाय, सुनेने आपल्याकडे साडेबारा कोटी रुपये, फ्लॅट, कार आणि घराचे हप्ते भरण्याची मागणी केली होती, असा दावाही विनायक राऊत यांनी पत्रकार परिषदेत केला. (Vinayak Raut)
Vinayak Raut : राऊत कुटुंबीयांच्या अडचणीत मोठी वाढ! मुख्य आरोपीला पोलिसांकडून अटक





