Maharashtra Politics : मोठी घडामोड..! भाजपचे 100 नगरसेवक काँग्रेसच्या संपर्कात? ‘या’ बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
Maharashtra Politics : पूर्व विदर्भातील विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील राजकीय वातावरण प्रचंड तापले आहे.

Maharashtra Politics : पूर्व विदर्भातील विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलेच तापले असून काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांच्या एका वक्तव्याने मोठी खळबळ उडाली आहे. काँग्रेसचे काही नगरसेवक भाजपच्या संपर्कात असल्याच्या चर्चेदरम्यान वडेट्टीवार यांनी उलट दावा करत भाजपमधील 100 हून अधिक नगरसेवक काँग्रेसच्या संपर्कात असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे पूर्व विदर्भातील राजकारणात नव्या चर्चांना उधाण आले आहे. (Maharashtra Politics)
काँग्रेसचे नगरसेवक ‘नॉट रिचेबल’
चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यातील काँग्रेसचे 60 हून अधिक नगरसेवक अचानक नॉट रिचेबल झाल्याची माहिती समोर आली आहे. हे नगरसेवक भाजपचे स्थानिक आमदार बंटी भांगडिया यांच्या संपर्कात असल्याची चर्चा रंगली आहे. त्यामुळे काँग्रेसमध्ये अस्वस्थता निर्माण झाली होती. (Maharashtra Politics)
भाजपचे 100 नगरसेवक आमच्या संपर्कात : वडेट्टीवार
या सर्व चर्चांदरम्यान वडेट्टीवार यांनी मोठा दावा केला. त्यांनी म्हटले की, आमच्याही संपर्कात भाजपचे 100 पेक्षा जास्त नगरसेवक आहेत. भाजपमध्येही मोठे अंतर्गत वाद आहेत. त्यातील दुसरा गट आम्हाला मदत करण्यास तयार आहे. मात्र आम्ही त्या भानगडीत पडत नाही. मात्र हे नगरसेवक नेमके कोणत्या भागातील आहेत किंवा त्यांची नावे काय आहेत, याबाबत त्यांनी कोणतीही माहिती दिली नाही. (Maharashtra Politics)
ही शंभर कोटींची निवडणूक
वडेट्टीवार यांनी विधान परिषद निवडणुकीवरही गंभीर आरोप केले. त्यांच्या मते, काही नगरसेवकांना टोकन म्हणून प्रत्येकी पाच लाख रुपये देण्यात आल्याची माहिती आहे. ही शंभर कोटींची निवडणूक आहे. जर एका नगरसेवकाला 15 लाख रुपये देऊन निवडणुका होत असतील, तर लोकशाही टिकेल का हा मोठा प्रश्न आहे, असे ते म्हणाले. (Maharashtra Politics)
पक्षांतर करणाऱ्यांवर कारवाईचा इशारा
काँग्रेसमधून संपर्काबाहेर गेलेल्या नगरसेवकांवर कारवाईचा इशाराही वडेट्टीवार यांनी दिला. जे नगरसेवक पक्षाचा व्हीप झुगारून जातील त्यांच्यावर योग्य ती कारवाई केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. (Maharashtra Politics)
पेट्रोल-डिझेल टंचाईवर सरकारवर टीका
इंधन टंचाई आणि दरवाढीवरूनही वडेट्टीवार यांनी केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. अमेरिकेच्या दबावामुळे भारताने इराण आणि रशियाकडून तेल खरेदी कमी केली असून त्यामुळेच देशात इंधन टंचाई निर्माण झाली आहे. पुढील महिनाभरात पेट्रोल 150 रुपये आणि डिझेल 140 रुपये प्रति लिटरपर्यंत जाऊ शकते, असा गंभीर इशाराही त्यांनी दिला. (Maharashtra Politics)
सध्या विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुती आणि महाविकास आघाडी दोन्ही बाजूंनी जोरदार राजकीय हालचाली सुरू असून आगामी काही दिवसांत आणखी मोठ्या घडामोडी घडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. (Maharashtra Politics)





