Fake FDA Officer : तोतयागिरीचा कळस! बनावट FDA अधिकारी बनून स्वीट्स विक्रेत्याला ६ लाखांना लुटले; दोघांना अटक, जुने गुन्हे उघड
Fake FDA Officer : सनदी अधिकारी तुकाराम मुंढेंच्या एफडीएचे अधिकारी असल्याचे सांगत वसईतील एका स्वीट्स दुकानाच्या मालकाला धमकी देऊन तब्बल सहा लाख रुपये लूटल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

Fake FDA Officer : सनदी अधिकारी तुकाराम मुंढेंच्या एफडीएचे अधिकारी असल्याचे सांगत वसईतील एका स्वीट्स दुकानाच्या मालकाला धमकी देऊन तब्बल सहा लाख रुपये लूटल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. (Fake FDA Officer)
याप्रकरणी विजय जाधव, स्वाती तुळसकर, तेजस राठोड आणि त्यांच्या एका साथीदाराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Fake FDA Officer)
स्वतःला अन्न व औषध प्रशासन (एफडीए) अधिकारी असल्याचे भासवत आरोपींकडून परिसरातील स्वीट मार्ट तसेच अन्न व औषध प्रशासनाच्या अधीन असलेल्या दुकानांवर कारवाईची धमकी देऊन पैसे उकळले. (Fake FDA Officer)
Tukaram Mundhe : ‘ही तर केवळ सुरुवात’; FDA चे आयुक्त तुकाराम मुंढेंची पोस्ट चर्चेत
याप्रकरणी, तक्रारदार रोहित सुखडिया यांच्यानुसार, 23 जून रोजी आरोपी त्यांच्या दुकानात आले, आपण एफडीएचे अधिकारी असल्याचे सांगत त्यांनी दुकानातील खाद्यपदार्थ व मुदतबाह्य वस्तूंचा मुद्दा उपस्थित केला. (Fake FDA Officer)
त्यानंतर, दुकान सील करणे, गुन्हा दाखल करणे आणि माध्यमांमध्ये बदनामी करण्याची धमकी देखील देण्यात आली. अखेर, हे प्रकरण मिटवण्यासाठी सुरुवातीला 12 लाख रुपयांची मागणी स्वीट मार्ट दुकानदाराकडे करण्यात आली.

Fake FDA Officer : तोतयागिरीचा कळस! बनावट FDA अधिकारी बनून स्वीट्स विक्रेत्याला ६ लाखांना लुटले; दोघांना अटक, जुने गुन्हे उघड
वाटाघाटीनंतर सहा लाख रुपये घेण्यात आल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. दरम्यान, विजय जाधव आणि स्वाती तुळसकर यांच्याविरोधात यापूर्वीही बोरीवली येथील एका हॉटेल व्यावसायिकाची बनावट एफडीए अधिकारी बनून फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल असल्याची माहिती समोर आली आहे. माणिकपूर पोलीस पुढील तपास करत आहेत. (Fake FDA Officer)





