Varun Chakravarthy : वरुण चक्रवर्तीला ‘ती’ कृती नडली; बीसीसीआयने केली मोठी कारवाई, पाहा VIDEO

Varun Chakravarthy Fined for IPL Code of Conduct Breach : आयपीएल २०२५ चा ५७ वा सामना केकेआर आणि सीएसके यांच्यात कोलकाता येथील ईडन गार्डन्स स्टेडियमवर पार पडला. या रोमांचक सामन्यात चेन्नईने शेवटच्या चेंडूवर कोलकात्याचा २ गडी राखून पराभव करून तिसरा विजय नोंदवला. या सामन्यानंतर बीसीसीआयने फिरकीपटू वरुण चक्रवर्तीवर दंडात्मक कारवाई केली.
या सामन्यात, केकेआरचा स्टार फिरकीपटू वरुण चक्रवर्तीने ४ षटकांच्या स्पेलमध्ये १८ धावा देत २ विकेट्स घेतल्या. परंतु, या शानदार कामगिरीनंतरही, त्याच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. आयपीएल आचारसंहितेचे उल्लंघन केल्याबद्दल वरुण चक्रवर्तीला सामना शुल्काच्या २५ टक्के दंड ठोठावण्यात आला आहे.
बीसीसीआयने वरुण चक्रवर्तीवर केली मोठी कारवाई –
Varun Chakravarthy celebration after taking Brevis wicket🔥🔥 pic.twitter.com/f99GGbvyzF
— KKR Vibe (@KnightsVibe) May 7, 2025
Spinner Varun Chakravarthy was fined 25 per cent of his match fee and handed a demerit point for breaching the code of conduct during his innings against Chennai Super Kings at Eden Gardens on Wednesday. pic.twitter.com/hxVN9oit6n
— 𝐂𝐂𝐑 (@CricComradeRaja) May 8, 2025
चेन्नई सुपर किंग्ज विरुद्धच्या सामन्यादरम्यान आयपीएल आचारसंहितेचे उल्लंघन केल्याबद्दल कोलकाता नाईट रायडर्स (केकेआर) चा फिरकी गोलंदाज वरुण चक्रवर्ती याला डिमेरिट पॉइंट देण्यात आला आहे. आयपीएलच्या निवेदनात असे म्हटले आहे की चक्रवर्तीने “कलम २.५ अंतर्गत लेव्हल १ चा गुन्हा कबूल केला आहे”, जो “अनुचित भाषा, कृती किंवा हावभाव वापरणे किंवा सामन्यादरम्यान दुसऱ्या खेळाडूकडून आक्षेपार्ह प्रतिक्रिया निर्माण करणे” याशी संबंधित आहे.
हेही वाचा – Rajasthan Royals : राजस्थानचा मोठा निर्णय! शेवट गोड करण्यासाठी खास ‘या’ दोन खेळाडूंना केले करारबद्ध
खरं तर, सामन्यात, चेन्नई सुपर किंग्जकडून स्फोटक फलंदाजी करणाऱ्या डेवाल्ड ब्रेव्हिसला रिंकू सिंगने झेलबाद केले. त्यावेळी वरुणने ब्रेव्हिसला पॅव्हेलियनमध्ये जाण्याचा इशारा केला होता. त्यामुळे बीसीसीआयने त्याच्यावर कडक कारवाई केली आहे. या सामन्यात ब्रेव्हिसने २५ चेंडूत ५२ धावांची स्फोटक खेळी केली आणि चेन्नई सुपर किंग्जला सामना जिंकण्यास मदत करण्यात महत्त्वपूर्ण योगदान दिले.
हेही वाचा – Rohit Sharma Retirement : ‘मला आठवते…’, रोहितच्या निवृत्तीनंतर सचिनकडून जुन्या आठवणींना उजाळा
आयपीएलने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, “आचारसंहितेच्या लेव्हल १ च्या उल्लंघनासाठी, मॅच रेफरीचा निर्णय अंतिम आणि बंधनकारक आहे,” आयपीएलने प्रत्यक्षात ही घटना काय होती हे सांगितले नाही, परंतु चक्रवर्तीने सीएसकेचा फलंदाज डेवाल्ड ब्रेव्हिसला बाद केल्यानंतर केलेल्या हावभावसाठी ही कारवाई करण्यात आली आहे. ज्यामुळे त्याच्या मॅच फीच्या २५ टक्के दंड ठोठावण्यात आला आहे.





