Rajasthan Royals : राजस्थानचा मोठा निर्णय! शेवट गोड करण्यासाठी खास ‘या’ दोन खेळाडूंना केले करारबद्ध

नितीश राणाच्या जागी लुहान ड्रे प्रिटोरियसला संधी –
फलंदाज नितीश राणा राजस्थान रॉयल्सच्या शेवटच्या सामन्यात खेळला नाही. कदाचित त्याला वगळण्यात आले असेल असे मानले जात होते. पण आता असे समोर आले आहे की तो जखमी होता आणि म्हणून तो उपलब्ध नव्हता. आता त्याच्या जागी लुहान ड्रे प्रिटोरियसला संधी मिळाली आहे, जो पहिल्यांदाच आयपीएलचा भाग असेल. प्रिटोरियससाठी आयपीएलचा अनुभव नवीन असू शकतो पण रॉयल्ससोबतचे त्याचे नाते जुने आहे.
🇿🇦 Fearless. Power-packed. Royal!
You’ve seen him in Pink — and you’ll see him soon in IPL 2025. 🔥
Lhuan dre Pretorius steps in for Nitish Rana, who’s healing from a calf injury. Speedy recovery, Nitish bhai! 💗 pic.twitter.com/B2JzFUlKZo
— Rajasthan Royals (@rajasthanroyals) May 8, 2025
हा तरुण फलंदाज दक्षिण आफ्रिकेच्या टी-२० लीग SA20 मध्ये पार्ल रॉयल्सचा भाग आहे. प्रिटोरियस हा एक अतिशय प्रतिभावान खेळाडू मानला जातो आणि आतापर्यंत त्याच्या टी-२० कारकिर्दीत त्याने ३३ सामन्यांमध्ये १४७.१७ च्या सरासरीने ९११ धावा केल्या आहेत. राजस्थानने या युवा फलंदाजाला ३० लाख रुपयांच्या बेस प्राइसवर करारबद्ध केले आहे.
हेही वाचा – Rohit Sharma Retirement : ‘मला आठवते…’, रोहितच्या निवृत्तीनंतर सचिनकडून जुन्या आठवणींना उजाळा
संदीप शर्माच्या जागी नांद्रे बर्गरला संधी –
IPL 2024. Powerplay. 153 kmph. Kuch yaad aaya? 👀
Nandre Burger will replace an injured Sandeep Sharma for the remainder of our IPL 2025 season. We wish Sandy a speedy recovery! 💗 pic.twitter.com/Q3cqD3dfkK
— Rajasthan Royals (@rajasthanroyals) May 8, 2025
नांद्रे बर्गरबद्दल बोलायचे झाले तर, आयपीएल २०२५ च्या मेगा लिलावात त्याला कोणताही खरेदीदार मिळाला नव्हता. पण, आता त्याला पुन्हा एकदा राजस्थान रॉयल्सने संघात समाविष्ट केले आहे. बर्गरला आयपीएल २०२४ मध्ये राजस्थान संघाने ६ सामन्यांमध्ये संधी दिली होती. ज्यामध्ये त्याने ७ विकेट्स घेतल्या होत्या. यावेळी आरआरने बर्गरला ३.५ कोटी रुपयांमध्ये आपल्या संघात सामील केले आहे.
हेही वाचा – Rawalpindi Stadium : PSL सामन्यापूर्वी ड्रोन हल्ल्याने खळबळ; परदेशी खेळाडू घरवापसीच्या तयारीत
त्याला संदीप शर्माच्या जागी संधी मिळाली आहे. संदीप शर्माच्या बोटाला दुखापत झाल्याने तो आधीच बाहेर पडल्याची पुष्टी झाली आहे. आयपीएल २०२५ मध्ये राजस्थान रॉयल्सचे आता फक्त दोन सामने शिल्लक आहेत. आरआर त्यांचे पुढील सामने १२ मे रोजी चेन्नई सुपर किंग्ज आणि १६ मे रोजी पंजाब किंग्ज विरुद्ध खेळणार आहे. हे सामने जिंकून राजस्थान संघ हंगामाचा शेवट चांगला करू इच्छितो.





