Rohit Sharma Retirement : ‘मला आठवते…’, रोहितच्या निवृत्तीनंतर सचिनकडून जुन्या आठवणींना उजाळा

Sachin Tendulkar on Rohit Sharma Test Debut : सर्वकालीन महान फलंदाजांपैकी एक असलेल्या सचिन तेंडुलकरने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेल्या रोहित शर्माचे कौतुक केले आहे. ‘क्रिकेटचा देव’ म्हणाला की हिटमॅनचा क्रिकेट प्रवास अद्भुत राहिला आहे आणि त्याने एक खेळाडू आणि कर्णधार म्हणून भारतीय क्रिकेटला आपले सर्वोत्तम दिले आहे. रोहित शर्माने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केल्यानंतर दुसऱ्या दिवशी सचिन तेंडुलकरनेही त्याच्या कसोटी पदार्पणाच्या आठवणीला उजाळा दिला आहे.
योगायोगाने, सचिन तेंडुलकरने ज्या मालिकेत कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली त्याच मालिकेत रोहित शर्माने पदार्पण केले होते. हिटमॅन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रोहितने दीर्घ प्रतीक्षेनंतर २०१३ मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध कसोटी पदार्पण केले. ऐतिहासिक ईडन गार्डन्स मैदानावर झालेल्या कसोटी पदार्पणात तरुण रोहितला टीम इंडियाची कॅप मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने दिली होती.
I remember presenting you with your Test cap in 2013 at Eden Gardens and then standing with you on the balcony of Wankhede Stadium the other day – your journey has been a remarkable one.
From then to now, you have given your best to Indian cricket as a player and as a captain.… pic.twitter.com/PwoQiKGvUr
— Sachin Tendulkar (@sachin_rt) May 8, 2025
सचिनकडून रोहितच्या कसोटी पदार्पणाला उजाला दिला –
रोहित शर्माच्या कसोटी पदार्पणाची आठवण करून देताना सचिन तेंडुलकर म्हणाला, ‘मला आठवते की मी २०१३ मध्ये ईडन गार्डन्सवर तुला कसोटी कॅप दिली होती आणि नंतर दुसऱ्या दिवशी वानखेडे स्टेडियमच्या बाल्कनीत तुझ्यासोबत उभा राहिलो होतो. तुझा प्रवास अद्भुत राहिला आहे. तेव्हापासून आतापर्यंत तू एक खेळाडू आणि कर्णधार म्हणून भारतीय क्रिकेटला तुमचे सर्वोत्तम दिले आहे. तुला पुढच्या भविष्यासाठी खूप खूप शुभेच्छा.’
हेही वाचा – Rawalpindi Stadium : PSL सामन्यापूर्वी ड्रोन हल्ल्याने खळबळ; परदेशी खेळाडू घरवापसीच्या तयारीत
रोहित शर्माने त्याच्या पहिल्याच कसोटी सामन्यात शतक झळकावत १७७ धावांची शानदार खेळी केली. त्या सामन्यात भारताने वेस्ट इंडिजचा एक डाव आणि ५१ धावांनी पराभव केला आणि रोहितला त्याच्या पहिल्याच कसोटी सामन्यात सामनावीर म्हणून निवडण्यात आले होते. गेल्या वर्षी भारताला टी-२० विश्वचषकात जेतेपद मिळवून दिल्यानंतर, रोहित शर्माने आंतरराष्ट्रीय टी-२० सामन्यांमधून निवृत्ती घेतली.
हेही वाचा – ऑपरेशन सिंदूरनंतर PBKS vs MI सामन्याचे ठिकाण अचानक बदलले, काय आहे कारण?
आता कसोटीतून निवृत्ती जाहीर केल्यानंतर त्याचे लक्ष एकदिवसीय सामन्यांवर असेल. कर्णधार म्हणून भारताला एकदिवसीय विश्वचषक जिंकून देण्यात आलेल्या अपयशाची भरपाई तो करू इच्छितो. रोहित शर्माच्या कसोटी कारकिर्दीबद्दल बोलायचे झाले तर, त्याने ६७ सामन्यांमध्ये १२ शतके आणि १८ अर्धशतकांसह ४३०१ कसोटी धावा केल्या आहेत.





