IND vs SA 2nd T20 (Match Result) :- भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात चार सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना सेंट जॉर्ज पार्क स्टेडियमवर रविवारी खेळवला गेला. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेनं भारतावर तीन गडी राखून मात करत मागील पराभवाचा बदला घेतला आहे. याआधी भारताने पहिल्या टी-20 सामन्यात यजमानांचा 61 धावांनी पराभव केला होता. रविवारी दक्षिण आफ्रिकेनं विजयासह मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली आहे. आता दोन्ही संघाचं लक्ष 13 नोव्हेंबरला सेंच्युरियन येथे खेळल्या जाणाऱ्या तिसऱ्या टी-20 सामन्यावर असेल.
प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या भारतीय संघाने 20 षटकांत 6 बाद 124 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात, ट्रिस्टन स्टब्सच्या नाबाद 47 धावांच्या स्फोटक खेळीमुळे दक्षिण आफ्रिकेने 19 षटकांत सात गडी गमावून 128 धावा केल्या आणि सामना जिंकला.
विजयासाठी 125 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेची सुरुवातही चांगली झाली नाही. 44 धावसंख्या होईपर्यंत आफ्रिकन संघाने 3 विकेट गमावल्या होत्या आणि धावसंख्या 86 धावांपर्यंत पोहोचली तोपर्यंत संघाचे 7 फलंदाज पॅव्हेलियनमध्ये परतले होते. येथून ट्रिस्टन स्टब्स आणि जेराल्ड कोएत्झी यांच्यातील नाबाद 42 धावांच्या भागीदारीने आफ्रिकन संघाचा विजय निश्चित केला. कोएत्झी एक गोलंदाज म्हणून ओळखला जातो, पण शेवटी त्याने 9 चेंडूत 19 धावांची छोटीशी खेळी खेळून संघाच्या विजयात मोठा वाटा उचलला.तर ट्रिस्टन स्टब्सने 41 चेंडूत नाबाद 47 धावांची मॅचविनिंग इनिंग खेळली आणि सामन्याचे चित्र बदलून टाकले.या सामन्यात आफ्रिकेकडून रायन रिक्लेटनने 13, रीझा हेंड्रिक्सने 24, एडन मार्करामने तीन, मार्को यानसेनने सात, क्लासेनने दोन, मिलरने शून्य आणि सिमिलानेने सात धावा केल्या. भारताकडून वरुणने पाच, रवी बिश्नोई आणि अर्शदीप सिंगने प्रत्येकी एक विकेट घेतली.
वरुण चक्रवर्तीने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या टी-20 सामन्यात 4 षटके टाकली, फक्त 17 धावा दिल्या आणि 5 बळी घेतले. पण दुर्दैवाने वरुणची मेहनत वाया गेली.असं असलं तरी टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्याच्या एकाच डावात 5 किंवा त्याहून अधिक बळी घेणारा तो आता पाचवा भारतीय गोलंदाज ठरला आहे. त्याच्याआधी भुवनेश्वर कुमार आणि कुलदीप यादव यांनी प्रत्येकी दोनदा अशी कामगिरी केली होती. तर युझवेंद्र चहल आणि दीपक चहर यांनी टी-20 सामन्यात प्रत्येकी एकदा अशी कामगिरी केली आहे.
तत्पूर्वी, दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार एडन मार्करमने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या भारतीय संघाने 20 षटकांत 6 बाद 124 धावा केल्या होत्या. नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या टीम इंडियाची सुरुवात खूपच खराब झाली. भारतीय संघाचे दोन्ही सलामीवीर अभिषेक शर्मा आणि संजू सॅमसन लवकर पॅव्हेलियनमध्ये परतले. अभिषेक शर्मा 5 चेंडूत 4 धावा करून बाद झाला तर पहिल्या सामन्यातील शतकवीर संजू सॅमसन खाते न उघडताच पॅव्हेलियनमध्ये परतला. यानंतर भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादववर नजरा खिळल्या होत्या, मात्र त्याने निराशा केली. सूर्यकुमार सुध्दा 9 चेंडूत 4 धावा करून माघारी परतला.
Innings Break! #TeamIndia post 124/6 on the board in the second T20I!
Over to our bowlers! 👍 👍
Scorecard ▶️ https://t.co/ojROEpNnzy #SAvIND pic.twitter.com/BVH8RycFzN
— BCCI (@BCCI) November 10, 2024
पॉवरप्लेमध्ये दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांनी कसून गोलंदाजी करत या काळात भारताला 4 षटकात 15 धावांवरच तीन धक्के दिले. भारतीय संघाला सुरुवातीच्या धक्क्यातून शेवटपर्यंत सावरता आले नाही, पण हार्दिकच्या धडाकेबाज खेळीच्या जोरावर लढाऊ धावसंख्या गाठण्यात यश आले. भारताकडून अष्टपैलू हार्दिक पांड्याने 45 चेंडूंत 4 चौकार आणि 4 षटकाराच्या मदतीने सर्वाधिक नाबाद 39 धावा केल्या. हार्दिक व्यतिरिक्त अक्षर पटेलने 21 चेंडूत 27 तर तिलक वर्माने 20 चेंडूत 20 धावांचे योगदान दिले. रिंकू सिंगही अपयशी ठरला. तो 11 चेंडूत 9 धावा करून बाद झाला. अर्शदीप सिंह 6 चेंडूत 7 धावा करून नाबाद राहिला.
दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांबद्दल बोलायचे झाले तर मार्को जॅन्सन, जेराल्ड कोएत्झी, अँडी सिमेलॉन, एडन मार्कराम आणि एन. पीटरने 1-1 विकेट घेतली. मार्को यानसेनने 4 षटकांत 25 धावांत 1 खेळाडू बाद केला. तर जेराल्ड कोएत्झीने 4 षटकात 25 धावा देत 1 बळी मिळवला.
IND vs SA 1st T20 : टीम इंडियानं डर्बन गाजवलं, पहिल्याच सामन्यात द. आफ्रिकेला 61 धावांनी लोळवलं…
दरम्यान, भारताने पहिल्या T20 सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा 61 धावांनी मोठ्या फरकाने पराभव केला होता आणि संघानं 3 टी-20 सामन्यांच्या मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली होती. पहिल्या सामन्यात संजू सॅमसनने दमदार कामगिरी करताना केवळ 50 चेंडूत शतकी खेळी केली होती. तर गोलंदाजीत रवी बिष्णोई व वरून चक्रवर्तीने प्रत्येकी 3 फलंदाज तंबूत पाठवले होते.