GT vs KKR : शुबमन गिलचं वादळ आणि रबाडाची धार! गुजरातची विजयाची हॅट्ट्रिक, तर कोलकाताचा ‘फ्लॉप शो’ कायम
GT vs KKR : अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या सामन्यात यजमान गुजरात टायटन्सने (GT) कोलकाताचा ५ गडी राखून पराभव केला.

GT vs KKR Gujarat Titans Victory Hat Trick : आयपीएल २०२६ मध्ये कोलकाता नाईट रायडर्स (KKR) आणि त्यांच्या चाहत्यांची निराशा थांबण्याचे नाव घेत नाहीये. शुक्रवारी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या सामन्यात यजमान गुजरात टायटन्सने (GT) कोलकाताचा ५ गडी राखून पराभव केला. या विजयासह गुजरातने विजयाची ‘हॅट्ट्रिक’ साधली असून कोलकाताचा संघ गुणतालिकेत पाच पराभवासह तळालाच राहिला आहे.
कॅमेरून ग्रीनची खेळी ठरली व्यर्थ –
या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा अजिंक्य रहाणेचा निर्णय कोलकातासाठी पुन्हा एकदा घातक ठरला. अवघ्या ३२ धावांवर ३ विकेट्स गमावल्यानंतर रोव्हमन पॉवेल (२७) आणि कॅमेरून ग्रीन यांनी डाव सावरला. ग्रीनने टीकाकारांना उत्तर देत या मोसमातील पहिले अर्धशतक झळकावले आणि ५५ चेंडूंत ७९ धावांची झुंजार खेळी केली. मात्र, शेवटच्या ५ षटकांत कोलकाताने हाराकिरी पत्करली आणि संघ १८० धावांत गारद झाला. गुजरातकडून कागिसो रबाडाने ३, तर मोहम्मद सिराज आणि अशोक शर्माने प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या.
2⃣ points in the bag ✅
Hat-trick of wins ✅@gujarat_titans wrap a fantastic all-round show at home 🥳🏠Scorecard ▶️ https://t.co/FACeUzse3B#TATAIPL | #KhelBindaas | #GTvKKR pic.twitter.com/mVnSg3ZI5p
— IndianPremierLeague (@IPL) April 17, 2026
शुबमन गिलची ८६ धावांची कॅप्टन इनिंग –
Class Personified from Shubman Gill 🤩
Updates ▶️ https://t.co/FACeUzse3B#TATAIPL | #KhelBindaas | #GTvKKR | @ShubmanGill pic.twitter.com/eJIAYRgSzq
— IndianPremierLeague (@IPL) April 17, 2026
प्रत्युत्तरात १८१ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना गुजरातचा कर्णधार शुबमन गिल पुन्हा एकदा चमकला. गिल आणि साई सुदर्शन (२२) यांनी ५७ धावांची सलामी दिली. त्यानंतर जोस बटलरने (२५) काही फटकेबाजी केली. मात्र, एका बाजूने शुबमन गिलने (८६) खिंड लढवत या मोसमातील सलग तिसरे अर्धशतक ठोकले. विजयासाठी काही धावा शिल्लक असताना तो बाद झाला असला तरी, शाहरुख खान आणि राहुल तेवतिया यांनी शेवटच्या षटकात दोन चेंडू राखून गुजरातला विजय मिळवून दिला.
गुजरातची झेप, कोलकाता ‘ब्लॅक आऊट’ –
या विजयासह गुजरात टायटन्सने ५ सामन्यांत ६ गुणांसह गुणतालिकेत चौथ्या क्रमांकावर झेप घेतली आहे. सुरुवातीचे दोन सामने हरल्यानंतर गुजरातने आता विजयाची हॅट्ट्रिक पूर्ण केली आहे. दुसरीकडे, ६ सामन्यांत ५ पराभव स्वीकारलेला कोलकाता नाईट रायडर्स केवळ १ गुणासह गुणतालिकेत शेवटच्या (१० व्या) स्थानावर आहे.





